वर्षभरात इन्फ्लूएंझाचे आढळले 3235 रुग्ण; 29 जणांचा मृत्यू
पुणे : पुढारी वृत्तसेवा : इन्फ्लूएंझा विषाणूमुळे उद्भवणार्या स्वाईन फ्लूने वर्षभरात 29 रुग्णांना मृत्यू झाला. तर, ‘एच3एन’मुळे 8 रुग्णांचा मृत्यू झाला. वर्षभरातील बाधित रुग्णांची संख्या 3235 असून, सध्या 7 रुग्ण उपचार घेत आहेत. संशयित रुग्णांची संख्या 16 लाख 62 हजार 44 इतकी आहे. इन्फ्लूएंझा विषाणूच्या एच1एन1, एच2एन2 आणि एच3एन2 अशा उपप्रकारांचा संसर्ग गेल्या काही वर्षांमध्ये वाढल्याचे दिसून येत आहे. यापैकी एच3एन2 विषाणूने फेब—ुवारी महिन्यात थैमान घातले. या विषाणूमुळे वर्षभरात 8 रुग्णांना मृत्यू झाला. पुणे, मुंबई आणि ठाण्यात रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. रुग्णांमध्ये ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी लक्षणे दिसून येतात.
जूनअखेर इन्फ्लूएंझा विषाणूचे रुग्ण वाढले असले, तरी त्यांचा मृत्यू मात्र कमी आहेत हे आरोग्य खात्याच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. यावर्षी 1 जानेवारी ते 8 डिसेंबरदरम्यान राज्यात एच1एन1 चे 1196 रुग्ण आढळले, तर एच3 एन2 चे 2039 रुग्ण आढळले. एच1एन1 मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 29, तर एच3एन2मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8 इतकी आहे.
The post वर्षभरात इन्फ्लूएंझाचे आढळले 3235 रुग्ण; 29 जणांचा मृत्यू appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : इन्फ्लूएंझा विषाणूमुळे उद्भवणार्या स्वाईन फ्लूने वर्षभरात 29 रुग्णांना मृत्यू झाला. तर, ‘एच3एन’मुळे 8 रुग्णांचा मृत्यू झाला. वर्षभरातील बाधित रुग्णांची संख्या 3235 असून, सध्या 7 रुग्ण उपचार घेत आहेत. संशयित रुग्णांची संख्या 16 लाख 62 हजार 44 इतकी आहे. इन्फ्लूएंझा विषाणूच्या एच1एन1, एच2एन2 आणि एच3एन2 अशा उपप्रकारांचा संसर्ग गेल्या काही वर्षांमध्ये …
The post वर्षभरात इन्फ्लूएंझाचे आढळले 3235 रुग्ण; 29 जणांचा मृत्यू appeared first on पुढारी.