‘आग्र्याहून सुटका’ स्मृतिदिनानिमित्त पालखी प्रस्थान सोहळा उत्साहात

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा… ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’असा जयघोष आणि पुणेकरांनी शिवरायांची मूर्ती ठेवलेली पालखी खांद्यावर घेत पुष्पवृष्टी करीत साजरा केलेला आनंदोत्सव… अशा शिवमय झालेल्या वातावरणात किल्ले राजगड उत्सवांतर्गत आग्र्याहून सुटका स्मृतिदिनानिमित्त लाक्षणिक पालखी सोहळा पुण्यात उत्साहात साजरा झाला. ‘शिवरायांची आग्र्याहून सुटका’ या घटनेला 357 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल … The post ‘आग्र्याहून सुटका’ स्मृतिदिनानिमित्त पालखी प्रस्थान सोहळा उत्साहात appeared first on पुढारी.
#image_title

‘आग्र्याहून सुटका’ स्मृतिदिनानिमित्त पालखी प्रस्थान सोहळा उत्साहात

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा… ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’असा जयघोष आणि पुणेकरांनी शिवरायांची मूर्ती ठेवलेली पालखी खांद्यावर घेत पुष्पवृष्टी करीत साजरा केलेला आनंदोत्सव… अशा शिवमय झालेल्या वातावरणात किल्ले राजगड उत्सवांतर्गत आग्र्याहून सुटका स्मृतिदिनानिमित्त लाक्षणिक पालखी सोहळा पुण्यात उत्साहात साजरा झाला. ‘शिवरायांची आग्र्याहून सुटका’ या घटनेला 357 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पालखी सोहळा व उत्सवाचे आयोजन करण्यात आले. पुणे महानगरपालिका आणि श्रीशिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 357 व्या आग्र्याहून सुटका स्मृतिदिनानिमित्त ‘किल्ले राजगड उत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :

Vision India@2047 : पंतप्रधान मोदी आज सादर करणार भारताच्या भविष्याचा रोडमॅप
निष्‍कारण मृत्‍यूला कवटाळू नका, तत्‍काळ शरणागती पत्‍करा : इस्रायलच्‍या पंतप्रधानांचे हमासला आवाहन
श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यास तीन वर्षे : स्वामी गोविंददेव गिरी महाराज

या वेळी मनपा उपायुक्त माधव जगताप, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजगडाचे गडकरी राजेंद्र सूर्यकांत भोसले, व्याख्यात्या सायली गोडबोले, श्रीशिवाजी राजगड स्मारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव प्रसादे, कार्यकारी समितीचे अध्यक्ष संजय दापोडीकर, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, उत्सव समिती अध्यक्ष सुनील वालगुडे यांसह मान्यवर उपस्थित होते. या वेळी पोवाडा व ढोल वादन सादरीकरण दि पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड ट्रस्ट यांनी केले. यावर्षी दि. 16 व 17 डिसेंबर 2023 रोजी आग्र्याहून सुटका स्मृतिदिन किल्ले राजगड पाल खु. येथील खंडोबाचा माळ व गडावरती साजरा करण्यात येत आहे. किल्ले राजगड खंडोबा माळावर, पाल गाव शनिवारी (दि.16) सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. स्थिर वादन, मर्दानी खेळ होतील. सायली गोडबोले-जोशी यांचा राजमाता जिजाऊ नाट्याविष्कार सादर होईल. अ‍ॅड. रवींद्र यादव यांचे शिव व्याख्यान होईल. किल्ले राजगड पद्मावती माता मंदिर येथे शनिवारी गड जागरण कार्यक्रमांतर्गत आर्ग्याहून सुटका याविषयी प्रास्ताविक भाषण होईल व व्याख्यात्यांची व्याख्याने होतील.
रविवारी ( दि. 17) सकाळी 6 वाजता सूर्योदयाला किल्ले राजगड येथे ध्वजारोहण होईल. किल्लेदार सूर्यकांत भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण व पद्मावती देवीचे पूजन होणार आहे. छत्रपती श्रीशिवाजी महाराज पालखी सोहळा ढोल, ताशांच्या गजरात पाली दरवाजा – सदर – पद्मावतीमाता मंदिर असा होणार आहे.
The post ‘आग्र्याहून सुटका’ स्मृतिदिनानिमित्त पालखी प्रस्थान सोहळा उत्साहात appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा… ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’असा जयघोष आणि पुणेकरांनी शिवरायांची मूर्ती ठेवलेली पालखी खांद्यावर घेत पुष्पवृष्टी करीत साजरा केलेला आनंदोत्सव… अशा शिवमय झालेल्या वातावरणात किल्ले राजगड उत्सवांतर्गत आग्र्याहून सुटका स्मृतिदिनानिमित्त लाक्षणिक पालखी सोहळा पुण्यात उत्साहात साजरा झाला. ‘शिवरायांची आग्र्याहून सुटका’ या घटनेला 357 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल …

The post ‘आग्र्याहून सुटका’ स्मृतिदिनानिमित्त पालखी प्रस्थान सोहळा उत्साहात appeared first on पुढारी.

Go to Source