सर्वात मोठा पराठा!
जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूर आपल्या व्यंजनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. येथील जयपूर पराठा जंक्शनमधील 32 इंची पराठा तर नेहमीच चर्चेत रहात आले आहे. 32 इंचांचा हा पराठा एखादी व्यक्ती एका तासाच्या आत फस्त करत असेल तर एक लाख रुपये जिंकण्याची संधी मिळू शकते. जयपूरमधील विविध ठिकाणी खवय्यांची रेलचेल असते. त्यातही या 32 इंची पराठ्याला त्यांची विशेष पसंती असते.
जयपूरमधील मानसरोवरच्या न्यू सांगानेर रोडवरील विजय पथ येथे स्थित जयपूर पराठा जंक्शनमध्ये जगातील सर्वात मोठा पराठा तयार केला जातो. या पराठ्याचा आकार पाहूनच येथील लोक थक्क होतात. जयपूर पराठा जंक्शनवर 32 इंच आणि 18 इंच पराठ्याबरोबरच एकूण 74 प्रकारचे पराठे तयार केले जातात.
जयपूर पराठा जंक्शनमधील 32 इंच पराठ्याला ‘बाहुबली पराठा’ या नावाने ओळखले जाते. या पराठ्यासह चटणी, रायता, लोणचे व भाजीही दिली जाते. 32 इंचीचा एक पराठा अगदी पाच जणांनाही सहज पुरतो. याचवेळी या पराठ्यासह एक आव्हान देखील आहे. हे आव्हान जर पार केले तर त्या व्यक्तीला एका लाखाचे इनाम दिले जाते. हे आव्हान म्हणजे 32 इंची पराठा एकट्याने एका तासात खाऊन दाखवणे. हे आव्हान पार केल्यास एक लाख रुपयांचे रोख इनाम तर मिळतेच शिवाय, पूर्ण हयातभर येथे पराठा जंक्शनमध्ये फ्री पराठे खाऊ शकता. जयपूर पराठा जंक्शनवर पराठा तयार करणार्या सतेंद्र सिंह यांनी हा पराठा तयार करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, त्याचा येथे उलगडा केला. हा पराठा तयार करण्यासाठी 5 फुटी तवा आहे. या तव्याचे वजनही 50 किलोपेक्षा अधिक असते. हा पराठा तयार करण्यासाठी 40 इंच मोठे लाटणे वापरले जाते. एकूण 20 प्रकारचे मसाले त्यात वापरले जातात. पराठा तयार झाल्यानंतर तो ग्राहकांच्या फमाईशीनुसार दिला जातो.
जयपूर पराठा जंक्शनवर पराठ्याचे 74 प्रकारचे व्हरायटी मिळते. अर्थातच अगदी दूर दूरवरुन खवय्ये येथे पराठ्याचा आस्वाद घेण्यासाठी येतात. येथील 32 इंची पराठ्याची किंमत 800 रुपये इतकी आहे.
The post सर्वात मोठा पराठा! appeared first on पुढारी.
जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूर आपल्या व्यंजनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. येथील जयपूर पराठा जंक्शनमधील 32 इंची पराठा तर नेहमीच चर्चेत रहात आले आहे. 32 इंचांचा हा पराठा एखादी व्यक्ती एका तासाच्या आत फस्त करत असेल तर एक लाख रुपये जिंकण्याची संधी मिळू शकते. जयपूरमधील विविध ठिकाणी खवय्यांची रेलचेल असते. त्यातही या 32 इंची पराठ्याला त्यांची …
The post सर्वात मोठा पराठा! appeared first on पुढारी.