चीनमधील सर्वात अद्भुत ‘स्काय रोड’!

बीजिंग : चीनमधील याक्सी एक्स्प्रेस वे हा त्या देशातील सर्वात अद्भूत महामार्ग मानला जातो. त्याची लांबी 240 श्किलोमीटर्स इतकी आहे. हा महामार्ग दक्षिण पश्चिम चीनमधील सिचुआनपासून जिचांग म्हणजे यान या ठिकाणांना जोडणारा आहे. याचाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स अर्थात पूर्वाश्रमीच्या टि्वटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला गेला आहे. त्यामध्ये या … The post चीनमधील सर्वात अद्भुत ‘स्काय रोड’! appeared first on पुढारी.
#image_title

चीनमधील सर्वात अद्भुत ‘स्काय रोड’!

बीजिंग : चीनमधील याक्सी एक्स्प्रेस वे हा त्या देशातील सर्वात अद्भूत महामार्ग मानला जातो. त्याची लांबी 240 श्किलोमीटर्स इतकी आहे. हा महामार्ग दक्षिण पश्चिम चीनमधील सिचुआनपासून जिचांग म्हणजे यान या ठिकाणांना जोडणारा आहे. याचाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स अर्थात पूर्वाश्रमीच्या टि्वटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला गेला आहे. त्यामध्ये या महामार्गाची पूर्ण कल्पना येते. दुर्गम डोंगर-पठाराच्या परिसरात महामार्गाची बांधणी थक्क करायला लावणारी आहे. हा महामार्ग 270 व्हायडक्टस व 25 भुयारांमधून केला गेला आहे. या महामार्गाची उंची समुद्र सपाटीपासून 600 मीटर्सपासून 3200 मीटर्सपर्यंत आहे. प्रत्येक किलोमीटरला या महामार्गाची उंची 7.5 मीटर वर असल्याने त्याला आकाशातील महामार्ग असेही म्हटले जाते. हा एक्स्प्रेस वे सिचुआन प्रांतातील जी 5 जिंकून महामार्गाचा एक भाग आहे. हा महामार्ग किंगयी, दादू व एनिंग या नद्यांवरुन जातो. याक्सी एक्स्प्रेसवर गव्हाजी ब्रिज देखील आहे. तो शिमियान काऊंटी, याआन, सिचुआनमध्ये 2500 मीटर्स उंचावर स्थित आहे. त्याची एकूण लांबी 1811 मीटर्स इतकी अहे. हा जगातील पहिला रेनफॉस्ड काँक्रिट टूस बि—ज मानला जातो.
या महामार्गाची 2007 पासून उभारणी सुरू केली गेली आणि 6 वर्षांपेक्षा कमी कालावधीत त्याला पूर्ण स्वरूप लाभले. 2012 मध्ये या महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले. या महामार्गाच्या उभारणीसाठी 20.6 बिलियन युआन अर्थात 3.3 बिलियन डॉलर्स इतका भरभक्कम खर्च आला आहे.
The post चीनमधील सर्वात अद्भुत ‘स्काय रोड’! appeared first on पुढारी.

बीजिंग : चीनमधील याक्सी एक्स्प्रेस वे हा त्या देशातील सर्वात अद्भूत महामार्ग मानला जातो. त्याची लांबी 240 श्किलोमीटर्स इतकी आहे. हा महामार्ग दक्षिण पश्चिम चीनमधील सिचुआनपासून जिचांग म्हणजे यान या ठिकाणांना जोडणारा आहे. याचाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स अर्थात पूर्वाश्रमीच्या टि्वटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला गेला आहे. त्यामध्ये या …

The post चीनमधील सर्वात अद्भुत ‘स्काय रोड’! appeared first on पुढारी.

Go to Source