दुर्मीळ ल्युसिस्टिकचा जन्म!
फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडा येथे जगातील सर्वात दुर्मीळ अशा सफेद मगरीचा जन्म झाला आहे. गुलाबी त्वचा, क्रिस्टल व निळ्या डोळ्यासह मगरीचे पिल्लू बाहेर आले, त्यावेळी ते पाहिल्यानंतर अभ्यासकांना देखील तो धक्का होता. या मादी जातीच्या पिलाने सर्वांची मने जिंकली आहेत. या पिलाला बेनी सिनात्रा असे ओळखले जावे, अशी मागणी काहींनी केली आहे.
गेटोरलँड ऑरलँडो येथे जन्मलेल्या या मगराची एक क्लीप यूट्यूबवर देखील पोस्ट केली गेली आहे. काजुन लोककथांप्रमाणे केवळ भाग्यवान लोकांनाच या सफेद मगरीचे दर्शन घडते. जगभरात केवळ सातच ल्युसिस्टिक एलिगेटर जिवंत आहेत आणि त्यातील तीन गेटोरलँडमध्येच आहेत. या मगरांच्या त्वचेचा पांढरा रंग जेनेटिक दोषामुळे असतो. त्यामुळे, त्यांची त्वचा मेलेनिनपासून होत तयार होत नाही.
गेटोरलँडचे अध्यक्ष व सीईओ मार्क मॅकहम याप्रसंगी म्हणाले, ‘या प्रजातीतील मगर अगदी दुर्मिळातही दुर्मीळ आहे. हा अतिशय असाधारण जीव आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभी या पिलाला सर्वांना पाहता येईल, अशी आमची योजना आहे. ल्युसिस्टिक गेर अतिशय दुर्मीळ असते. अल्बिनो मगरांचे डोळे गुलाबी असतात. पण, ल्युसिस्टिक मगराचे डोळे क्रिस्टल निळे असते. जगभरात अल्बिनो मगर मोठ्या प्रमाणात आहेत. पण, ल्युसिस्टिक मगरांचे प्रमाण खूपच कमी आहे. ’
The post दुर्मीळ ल्युसिस्टिकचा जन्म! appeared first on पुढारी.
फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडा येथे जगातील सर्वात दुर्मीळ अशा सफेद मगरीचा जन्म झाला आहे. गुलाबी त्वचा, क्रिस्टल व निळ्या डोळ्यासह मगरीचे पिल्लू बाहेर आले, त्यावेळी ते पाहिल्यानंतर अभ्यासकांना देखील तो धक्का होता. या मादी जातीच्या पिलाने सर्वांची मने जिंकली आहेत. या पिलाला बेनी सिनात्रा असे ओळखले जावे, अशी मागणी काहींनी केली आहे. गेटोरलँड ऑरलँडो येथे …
The post दुर्मीळ ल्युसिस्टिकचा जन्म! appeared first on पुढारी.