कवडीमोल जुनी तिजोरी अन् नशीबच पालटले

टेक्सास : 2015 मध्ये, एका जंक वॉर्डरोबने म्हणजेच अलमारीने टेक्सासच्या माणसाचे नशीब बदलले. एमिल नावाच्या या व्यक्तीने एकशे पंचवीस वर्षे जुना वॉर्डरोब विकत घेतला होता. पुरातन वस्तू आहे असे समजून घरी आणलेल्या या कपाटाने एमिलचे आयुष्य बदलून टाकले होते. अवघ्या आठ हजार रुपयांत कपाटातून एवढा खजिना मिळेल, जे आयुष्य बदलून टाकेल. याची कल्पनाही त्यांनी केली … The post कवडीमोल जुनी तिजोरी अन् नशीबच पालटले appeared first on पुढारी.
#image_title

कवडीमोल जुनी तिजोरी अन् नशीबच पालटले

टेक्सास : 2015 मध्ये, एका जंक वॉर्डरोबने म्हणजेच अलमारीने टेक्सासच्या माणसाचे नशीब बदलले. एमिल नावाच्या या व्यक्तीने एकशे पंचवीस वर्षे जुना वॉर्डरोब विकत घेतला होता. पुरातन वस्तू आहे असे समजून घरी आणलेल्या या कपाटाने एमिलचे आयुष्य बदलून टाकले होते. अवघ्या आठ हजार रुपयांत कपाटातून एवढा खजिना मिळेल, जे आयुष्य बदलून टाकेल. याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. मात्र, हा खजिना सापडल्यानंतर एमिलने जे केले त्याने सर्वांची मने जिंकली.
हे संपूर्ण प्रकरण 2015 मध्ये घडले. पण पुन्हा एकदा या शोधाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला, जिथून तो व्हायरल होत आहे. यामध्ये एमिल नावाच्या व्यक्तीने आपले नशीब बदलताना पाहिले. एमिलने एक कपाट खरेदी केले होते, जे सुमारे 125 वर्षे जुने होते. या कपाटावरील संगमरवरी वर्क आणि वूड फिनिश त्याला खूप आवडले. या कारणासाठी त्यांनी हे कपाट आठ हजारांना विकत घेतले. पण एमिलला त्याच्या आत जे सापडले, त्याची कल्पनाही केली नव्हती.
एमिलने जेव्हा हे कपाट घरी आणून आपल्या जेवणाच्या खोलीत ठेवायला सुरुवात केली तेव्हा त्याला आतून खळखळ आवाज आला. एमिलने आपल्या मुलासह कपाट तपासले. खूप दिवसांनी कपाटात गुप्त ड्रॉवर असल्याचे त्याला आढळले. त्यात अनेक मौल्यवान स्टोन, हार, सोने आणि दागिने ठेवले होते. कायद्यानुसार, हा खजिना एमिलचा होता, पण त्याने याला चोरी मानले. त्यांनी तत्काळ कपाटाच्या मूळ मालकांशी संपर्क साधून त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. कपाटाची मालकी असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता, पण खजिना परत केल्याबद्दल त्याच्या मुलांनी एमिलचे आभार मानले.
The post कवडीमोल जुनी तिजोरी अन् नशीबच पालटले appeared first on पुढारी.

टेक्सास : 2015 मध्ये, एका जंक वॉर्डरोबने म्हणजेच अलमारीने टेक्सासच्या माणसाचे नशीब बदलले. एमिल नावाच्या या व्यक्तीने एकशे पंचवीस वर्षे जुना वॉर्डरोब विकत घेतला होता. पुरातन वस्तू आहे असे समजून घरी आणलेल्या या कपाटाने एमिलचे आयुष्य बदलून टाकले होते. अवघ्या आठ हजार रुपयांत कपाटातून एवढा खजिना मिळेल, जे आयुष्य बदलून टाकेल. याची कल्पनाही त्यांनी केली …

The post कवडीमोल जुनी तिजोरी अन् नशीबच पालटले appeared first on पुढारी.

Go to Source