स्मृती इराणी यांनी विणले ‘दो धागे श्रीराम के लिए’
पुणे : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याच्या ’दो धागे श्रीराम के लिए’ या उपक्रमाला रविवारपासून पुण्यात सुरुवात झाली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या आणि पुण्यातील हेरिटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल
ट्रस्ट यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री स्मृती इराणी यांनी उपक्रमाचे पहिले धागे विणून सुरुवात केली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे मुख्य मार्गदर्शक भैय्याजी जोशी, कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ट्रस्टच्या संचालिका अनघा घैसास या वेळी उपस्थित होत्या. उद्घाटनानंतर 22 डिसेंबरपर्यंत पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील सौदामिनी हँडलूम या ठिकाणी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत नागरिकांना येऊन श्रद्धेचे व विश्वासाचे दोन धागे आपल्या प्रभू श्रीराम यांच्यासाठी येथे उपलब्ध करून दिलेल्या हातमागावर विणता येणार आहेत.
The post स्मृती इराणी यांनी विणले ‘दो धागे श्रीराम के लिए’ appeared first on पुढारी.
पुणे : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याच्या ’दो धागे श्रीराम के लिए’ या उपक्रमाला रविवारपासून पुण्यात सुरुवात झाली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या आणि पुण्यातील हेरिटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री स्मृती इराणी यांनी उपक्रमाचे पहिले धागे विणून सुरुवात केली. श्रीराम जन्मभूमी …
The post स्मृती इराणी यांनी विणले ‘दो धागे श्रीराम के लिए’ appeared first on पुढारी.