सातारा : साखरपुड्यानंतर युवतीने गंडवले
सातारा; पुढारी वृत्तसेवा : युवकासोबत ओळख झाल्यानंतर त्याचा गैरफायदा घेऊन युवतीने युवकाला गंडवले. साखरपुडा झाल्यानंतर पैसे उकळत तब्बल 16 लाखांना फसवल्याचे समोर आले. गुंतवणुकीचे तसेच युवकाला लग्नाचे आमिष दाखवण्यात आले. मात्र लग्नही नाही अन् गुंतवणुकीचे पैसे मिळत नसल्याने अखेर हे प्रकरण सातारा शहर पोलिस ठाण्यात पोहोचले. युवतीने फसवणूक केल्याची तक्रार युवकाने दाखल केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 19 नोव्हेंबर 2022 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घडली असल्याचे युवकाने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार युवक व संशयित युवती दोघेही सातारा शहरातील आहेत. दोघांची गेल्यावर्षी ओळख झाल्यानंतर युवतीने युवकाकडून गुंतवणुकीसाठी 1 लाख रुपये घेतले. यानंतर युवतीने आणखी सलगी वाढवत लग्नाचे आमिष दाखवले. दोघांचा साखरपुडा झाल्यानंतर युवतीने तक्रारदार युवकाकडून 5 लाख व युवकाच्या नातेवाईकाकडून 10 लाख रुपये गुंतवणुकीसाठी घेतले.
सुमारे 16 लाख रुपयांची रक्कम युवतीला दिल्यानंतर तिने परतावा देण्यास टाळाटाळ केला. तसेच त्या युवतीने उलट आणखी पैसे मागण्यास सुरुवात केली. यातून युवकाने पैसे परत कधी देणार, असा तगादा लावला. यातून युवतीने युवकाला लग्न करण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर अखेर युवकाने सातारा शहर पोलिस ठाणे गाठले. घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी युवती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The post सातारा : साखरपुड्यानंतर युवतीने गंडवले appeared first on पुढारी.
सातारा; पुढारी वृत्तसेवा : युवकासोबत ओळख झाल्यानंतर त्याचा गैरफायदा घेऊन युवतीने युवकाला गंडवले. साखरपुडा झाल्यानंतर पैसे उकळत तब्बल 16 लाखांना फसवल्याचे समोर आले. गुंतवणुकीचे तसेच युवकाला लग्नाचे आमिष दाखवण्यात आले. मात्र लग्नही नाही अन् गुंतवणुकीचे पैसे मिळत नसल्याने अखेर हे प्रकरण सातारा शहर पोलिस ठाण्यात पोहोचले. युवतीने फसवणूक केल्याची तक्रार युवकाने दाखल केली. याबाबत पोलिसांनी …
The post सातारा : साखरपुड्यानंतर युवतीने गंडवले appeared first on पुढारी.