लासलगावला आजपासून कांदा लिलाव, व्यापारीवर्गात फूट?

लासलगाव पुढारी वृत्तसेवा– येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (दि.१०) व्यापाऱ्यांच्या बैठक होऊन सोमवारपासून कांदा लिलाव (Onion News) पूर्वरत सुरू करण्याचा निर्णय झाल्याी माहिती सभापती बाळासाहेब क्षीरसागर व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली आहे. शेतकरी वर्गाचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे व्यापारीवर्गाकडून बोलले जात आहे. तर दुसरीकडे जिल्हा उपनिबंधक यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पत्र … The post लासलगावला आजपासून कांदा लिलाव, व्यापारीवर्गात फूट? appeared first on पुढारी.
#image_title

लासलगावला आजपासून कांदा लिलाव, व्यापारीवर्गात फूट?

लासलगाव पुढारी वृत्तसेवा– येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (दि.१०) व्यापाऱ्यांच्या बैठक होऊन सोमवारपासून कांदा लिलाव (Onion News) पूर्वरत सुरू करण्याचा निर्णय झाल्याी माहिती सभापती बाळासाहेब क्षीरसागर व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली आहे. शेतकरी वर्गाचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे व्यापारीवर्गाकडून बोलले जात आहे. तर दुसरीकडे जिल्हा उपनिबंधक यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पत्र लिहून कांदा लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करत परवाने रद्द करून त्यांचे भूखंड जमा करण्याचे आदेश दिले होते. त्याअंतर्गत होणारी कारवाई टाळण्यासाठी व्यापारी असोसिएशनने रविवारी गुप्त बैठक घेऊन लिलावात सहभागी होण्याचे ठरवल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.
बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजेपासून लासलगाव बाजार समितीच्या मुख्य आवारात कांदा लिलाव सुरू होणार आहे. दोन दिवसांपुर्वी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू केल्याच्या निषेधार्थ व्यापारी वर्गाने लिलावात सहभागी होण्यास असमर्थता दर्शवली होती. जोपर्यंत निर्यातबंदी उठवत नाही, तोपर्यंत कांदा लिलावात सहभागी होणार नाही, असा निर्णय चांदवडला जिल्हा व्यापारी असोसिएशनने घेतलेल्या बैठकीत निर्णय घेतला होता. मात्र व्यापारीवर्गामध्ये फूट पडल्याने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, निफाड, सायखेडा, पिंपळगाव बसवंत या बाजार समित्यांमध्ये सोमवारपासून कांदा लिलाव सुरू होणार असल्याने शेतकरीवर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. त्यातही कांद्याला काय भाव पुकारला जाताे, याकडे शेतकरीवर्गाच्या नजरा असतील. Onion News
हेही वाचा :

Nashik News : मातोरी रोडवर इनोव्हा कार जळून खाक, मोठी दुर्घटना टळली
पाकमध्ये भारतविरोधी दहशतवाद्यांचे काऊंटडाऊन
Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? |सोमवार, ११ डिसें‍‍‍बर २०२३

The post लासलगावला आजपासून कांदा लिलाव, व्यापारीवर्गात फूट? appeared first on पुढारी.

लासलगाव पुढारी वृत्तसेवा– येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (दि.१०) व्यापाऱ्यांच्या बैठक होऊन सोमवारपासून कांदा लिलाव (Onion News) पूर्वरत सुरू करण्याचा निर्णय झाल्याी माहिती सभापती बाळासाहेब क्षीरसागर व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली आहे. शेतकरी वर्गाचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे व्यापारीवर्गाकडून बोलले जात आहे. तर दुसरीकडे जिल्हा उपनिबंधक यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पत्र …

The post लासलगावला आजपासून कांदा लिलाव, व्यापारीवर्गात फूट? appeared first on पुढारी.

Go to Source