सातारा : जिल्ह्यात महायुतीत ठिणगी
सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा, रायगड व बारामतीची लोकसभेची जागा आम्ही लढवणार असल्याचे जाहीर केले असतानाच आता भारतीय जनता पक्षानेही या जागेवर दावा केला आहे.
पक्षाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आ. जयकुमार गोरे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन ही जागा कोणत्याही परिस्थितीत भाजप सोडणार नसल्याचे ठामपणे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा लोकसभेबाबत घेतलेली भूमिका व्यक्तिगत असल्याचेही ते म्हणाले. सातार्यातील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत बोलताना आ. जयकुमार गोरे म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मात्र ही भूमिका सर्वांनी विचार करून मांडली पाहिजे. जागा वाटप तिन्ही पक्षाच्या समन्वयाने ठरणार आहे. जिल्ह्यात भाजपच एक नंबर असून सातारा लोकसभा भाजपच लढवणार आहे. वाई, सातारा, कोरेगाव, कराड उत्तर, दक्षिण आणि पाटण या सगळ्या परिसरामध्ये भाजपाचे प्राबल्य आहे. पूर्वीची राष्ट्रवादी या जिल्ह्यामध्ये प्रबळ होती याबद्दल कोणाला शंका नाही. परंतु, राष्ट्रवादी आता प्रबळ नाही. राष्ट्रवादीपेक्षा भाजपची जिल्ह्यात जास्त ताकत असून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपच सक्षम आहे. जिल्ह्यात खूप गोष्टी बदलल्या आहेत. बदलेल्या परिस्थितीत भारतीय जनता पार्टीच लोकसभेला विकल्प असल्याचेही आ. गोरे म्हणाले.
सातारा लोकसभेच्या अजितदादांच्या दाव्याबाबत विचारले असता आ. गोरे म्हणाले, याबाबत वरिष्ठांकडे भूमिका मांडली आहे. सातार्यावर भाजपच क्लेम करणार आहे. अधिवेशनानंतर वरिष्ठ नेते बसून त्याच्यावर निर्णय घेतील. पाच राज्यांच्या निवडणुकानंतर इंडिया आघाडीची बैठक होईल की नाही हे सांगता येणार नाही. तसेच खा. रणजितसिंह यांना उमेदवारी मिळाल्यास माझ्याएवढा आनंद कोणाला नसेल.
अजित पवार गटातून लोकसभेसाठी नितीन पाटील यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता आ. गोरे म्हणाले, कोणी कोणास भेटावे हा त्याचा व्यक्तीस्वातंत्र्याचा विषय आहे. दरम्यान, भाजप पदाधिकारी निवडीमध्ये सर्वांना न्याय देण्याचे सोपे नसते. ज्या ज्या ठिकाणी कार्यकारिणी जाहीर झाली तेथे नाराजीचे सूर होते मात्र नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा झाली असल्याचेही आ. गोरे यांनी सांगितले.
The post सातारा : जिल्ह्यात महायुतीत ठिणगी appeared first on पुढारी.
सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा, रायगड व बारामतीची लोकसभेची जागा आम्ही लढवणार असल्याचे जाहीर केले असतानाच आता भारतीय जनता पक्षानेही या जागेवर दावा केला आहे. पक्षाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आ. जयकुमार गोरे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन ही जागा कोणत्याही परिस्थितीत …
The post सातारा : जिल्ह्यात महायुतीत ठिणगी appeared first on पुढारी.