हुडहुडी वाढली ! विदर्भ गारठण्यास सुरुवात; गोंदियाचा पारा 12.6 अंशावर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विदर्भ गारठण्यास सुरुवात झाली असून रविवारी गोंदिया शहराचे तापमान राज्यात सर्वात कमी 12.6 अंशावर खाली आले होते. त्यापाठोपाठ नागपूर, वर्धा, यवतमाळ ही शहरेही गारठली. उर्वरित राज्यात मात्र अजून दोन दिवसानंतर थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या मालदीव क्षेत्रावर चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही आहे. … The post हुडहुडी वाढली ! विदर्भ गारठण्यास सुरुवात; गोंदियाचा पारा 12.6 अंशावर appeared first on पुढारी.
#image_title

हुडहुडी वाढली ! विदर्भ गारठण्यास सुरुवात; गोंदियाचा पारा 12.6 अंशावर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विदर्भ गारठण्यास सुरुवात झाली असून रविवारी गोंदिया शहराचे तापमान राज्यात सर्वात कमी 12.6 अंशावर खाली आले होते. त्यापाठोपाठ नागपूर, वर्धा, यवतमाळ ही शहरेही गारठली. उर्वरित राज्यात मात्र अजून दोन दिवसानंतर थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या मालदीव क्षेत्रावर चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही आहे. पश्चिम हिमालयीन प्रदेशावर सोमवारी पश्चिमी चक्रवात सक्रिय होत असल्याने अवघा मध्य भारत गारठेल असा अंदाज आहे. मध्य भारताचे किमान तापमान 2 ते 3 अंशांनी कमी होईल, असाही अंदाज आहे.
दक्षिण भारतात अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे. आगामी आठवडाभर केरळ, दक्षिण तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 11 रोजी उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. 12 डिसेंबर रोजी मध्य भारतात दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व वातावरणाचा परिणाम राज्यात होत आहे. विदर्भापासून रविवारी राज्य गारठण्यास सुरुवात झाली. गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळचा पारा 12 अंशावर खाली आला होता.
रविवारचे राज्याचे किमान तापमान..
गोंदिया 12.6, नागपूर 12.9, चंद्रपूर 13.6, यवतमाळ 13.7, महाबळेश्वर 14.7, पुणे 15.3, मुंबई 21.2, कोल्हापूर 19.6, जळगाव 15.9, नाशिक 15.3, सांगली 19.3, सातारा 17.5, सोलापूर 18.6, छत्रपती संभाजीनगर 15.4, परभणी 15.9, नांदेड 15.8,
बीड 15.7
The post हुडहुडी वाढली ! विदर्भ गारठण्यास सुरुवात; गोंदियाचा पारा 12.6 अंशावर appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विदर्भ गारठण्यास सुरुवात झाली असून रविवारी गोंदिया शहराचे तापमान राज्यात सर्वात कमी 12.6 अंशावर खाली आले होते. त्यापाठोपाठ नागपूर, वर्धा, यवतमाळ ही शहरेही गारठली. उर्वरित राज्यात मात्र अजून दोन दिवसानंतर थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या मालदीव क्षेत्रावर चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही आहे. …

The post हुडहुडी वाढली ! विदर्भ गारठण्यास सुरुवात; गोंदियाचा पारा 12.6 अंशावर appeared first on पुढारी.

Go to Source