Nashik News : मातोरी रोडवर इनोव्हा कार जळून खाक

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- म्हसरूळ पोलीस ठाण्यात हद्दीतील मखमलाबाद – मातोरी रोडवर रविवार (दि. १०) रोजी रात्री एका इनोव्हा कारला आग लागल्याची घटना घडली होती. यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून कार मात्र जळून खाक झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वेश पोपटराव कोकाटे (वय २५, रा. काठे गल्ली , द्वारका, नाशिक) हे … The post Nashik News : मातोरी रोडवर इनोव्हा कार जळून खाक appeared first on पुढारी.
#image_title

Nashik News : मातोरी रोडवर इनोव्हा कार जळून खाक

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- म्हसरूळ पोलीस ठाण्यात हद्दीतील मखमलाबाद – मातोरी रोडवर रविवार (दि. १०) रोजी रात्री एका इनोव्हा कारला आग लागल्याची घटना घडली होती. यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून कार मात्र जळून खाक झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वेश पोपटराव कोकाटे (वय २५, रा. काठे गल्ली , द्वारका, नाशिक) हे आपली इनोव्हा क्रमांक (एम एच १५ डी एम ००६६) दुगावकडून नाशिककडे येत होते. मातोरी रोडवरील हॉटेल उत्सव जवळ इनोव्हा कारच्या पुढील चाकाने अचानक पेट घेतला. सर्वेश यांनी गाडी रस्त्याच्या कडेला लावत गाडीतील सर्व जण खाली उतरले. मात्र काही वेळातच गाडीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. सदर घटनेची माहिती म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर यांना कळताच त्यांनी सदर माहिती तातडीने गुन्हे शोध पथकास कळविली. सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, पोलिस अंमलदार योगेश ससकर, प्रशांत देवरे घटनास्थळी धाव घेतली आणि लागलीच अग्निशामक दलास पाचारण केले. यावेळी तात्काळ अग्निशामक एक बंब दाखल झाला आणि आग विझविली.
हेही वाचा :

ट्रक ड्रायव्हरची केबिन एसी असणे अनिवार्य; केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून अधिसूचना जारी
देशातील पहिली ‘बुलेट ट्रेन’ लवकरच
मराठा ओबीसी नेत्यांच्या वादाची मला वेदना होते : संभाजीराजे छत्रपती

The post Nashik News : मातोरी रोडवर इनोव्हा कार जळून खाक appeared first on पुढारी.

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- म्हसरूळ पोलीस ठाण्यात हद्दीतील मखमलाबाद – मातोरी रोडवर रविवार (दि. १०) रोजी रात्री एका इनोव्हा कारला आग लागल्याची घटना घडली होती. यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून कार मात्र जळून खाक झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वेश पोपटराव कोकाटे (वय २५, रा. काठे गल्ली , द्वारका, नाशिक) हे …

The post Nashik News : मातोरी रोडवर इनोव्हा कार जळून खाक appeared first on पुढारी.

Go to Source