आता राज्यसभेत नमाजासाठी ‘ब्रेक’ नाही; राज्यसभा सभापतींचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभेने नमाज संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यान राज्यसभेत दर शुक्रवारी अर्ध्या तासाचा ब्रेक दिला जात होता, तो आता रद्द करण्यात आला आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी हा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या नियमात बदल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. आतापर्यंत राज्यसभेत दुपारच्या जेवणाची वेळ दर शुक्रवारी १ … The post आता राज्यसभेत नमाजासाठी ‘ब्रेक’ नाही; राज्यसभा सभापतींचा निर्णय appeared first on पुढारी.
#image_title
आता राज्यसभेत नमाजासाठी ‘ब्रेक’ नाही; राज्यसभा सभापतींचा निर्णय


पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभेने नमाज संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यान राज्यसभेत दर शुक्रवारी अर्ध्या तासाचा ब्रेक दिला जात होता, तो आता रद्द करण्यात आला आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी हा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या नियमात बदल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
आतापर्यंत राज्यसभेत दुपारच्या जेवणाची वेळ दर शुक्रवारी १ ते २:३० पर्यंत होता. त्याच वेळी लोकसभेत दुपारच्या जेवणाचा वेळ दुपारी १ ते २ पर्यंत असते. हा अतिरिक्त अर्धा तास राज्यसभेत नमाजासाठी देण्यात आला होता. आता सभापतींनी नियमात बदल करून अर्धा तास रद्द केला आहे.
या संदर्भात निर्णय कधी घेण्यात आला? सभागृहातील सदस्यांना याची माहिती नाही, हा बदल का झाला? असा सवाल काही सदस्यांनी केला. त्यावर सभापती धनखड यांनी हा बदल आधीच केला आहे. लोकसभेचे कामकाज २ वाजता सुरू होते. लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्ही संसदेचा भाग आहेत. दोन्ही सभागृहाच्या कामाच्या वेळेत समानता असावी, यासाठी आधीच नियमावली बनवली होती, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :

2025 मध्ये 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था : गृहमंत्री शहा
असा होता ब्रिटिशकालीन भारतीय पासपोर्ट
ट्रक ड्रायव्हरची केबिन होणार एसी

 
The post आता राज्यसभेत नमाजासाठी ‘ब्रेक’ नाही; राज्यसभा सभापतींचा निर्णय appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभेने नमाज संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यान राज्यसभेत दर शुक्रवारी अर्ध्या तासाचा ब्रेक दिला जात होता, तो आता रद्द करण्यात आला आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी हा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या नियमात बदल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. आतापर्यंत राज्यसभेत दुपारच्या जेवणाची वेळ दर शुक्रवारी १ …

The post आता राज्यसभेत नमाजासाठी ‘ब्रेक’ नाही; राज्यसभा सभापतींचा निर्णय appeared first on पुढारी.

Go to Source