सिंधुदुर्ग ; मुंबई-गोवा महामार्गावर कारची दुचाकीला धडक, एक जखमी

सिंधुदुर्ग ; मुंबई-गोवा महामार्गावर कारची दुचाकीला धडक, एक जखमी

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव ओटव फाटा खालची मुस्लिमवाडीजवळ (मंगळवार) सायंकाळी ३:३० च्या सुमारास दुचाकी व कार यांच्यात अपघात झाला. गोव्याहून पुणे येथे जाणाऱ्या कारची दुचाकीला धडक बसून हा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
हा अपघात निव्वळ मिडलकट चालू असल्यामुळे झाल्‍याची संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताला सर्वस्वी जबाबदार हायवे प्राधिकरण आणि केसीसी कंपनी आहे अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हे असेच चालू राहिले तर, कायदा हातात घ्यावा लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्‍त होत आहे.
अपघातांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने सष्टेंबर महिन्यात खारेपाटण ते कणकवली पर्यंत असलेले सर्व अनधिकृत मिडलं कट बंद करावेत अशी मागणी केली होती. २० नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली असून, २० नोव्हेंबर पर्यंत मिडल कट बंद न केल्यास २१ रोजी मनसे तर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अनिकेत तर्फे यांनी दिला आहे.
हेही वाचा :

Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटील आजपासून राज्यव्यापी दौऱ्यावर

Nana Patekar : नाना पाटेकर यांनी सेल्फी घेण्यासाठी गेलेल्या ‘त्या’ तरुणाला मारले डोक्यात (Viral Video) 
Uttarakhand Tunnel Crash News | मजुरांशी वॉकी-टॉकी वरून संवाद; बचाव कार्याला वेग, आज सर्व कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्‍न

The post सिंधुदुर्ग ; मुंबई-गोवा महामार्गावर कारची दुचाकीला धडक, एक जखमी appeared first on पुढारी.

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव ओटव फाटा खालची मुस्लिमवाडीजवळ (मंगळवार) सायंकाळी ३:३० च्या सुमारास दुचाकी व कार यांच्यात अपघात झाला. गोव्याहून पुणे येथे जाणाऱ्या कारची दुचाकीला धडक बसून हा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात निव्वळ मिडलकट चालू असल्यामुळे झाल्‍याची संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या ठिकाणी झालेल्या …

The post सिंधुदुर्ग ; मुंबई-गोवा महामार्गावर कारची दुचाकीला धडक, एक जखमी appeared first on पुढारी.

Go to Source