पाकमध्ये भारतविरोधी दहशतवाद्यांचे काऊंटडाऊन
इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानात असलेल्या भारताच्या मोस्ट वाँटेडस्चे काऊंटडाऊन सुरूच असून, ताज्या घटनेत पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी औरंगजेब आलमगीर याचे इस्लामाबादेत अपहरण झाले आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा औरंगजेब हा हाफिजाबादहून डेरा गाझी गुलाम शहराकडे मोटारसायकलवरून जात असताना एका कारमधून काही बंदूकधारी तरुण आले आणि आलमगीरला उचलून नेले. एका निर्जन भागातून पोलिसांनी औरंगजेबची मोटारसायकल जप्त केली आहे. औरंगजेब हा बहावलपूरचा; पण गेल्या काही काळात त्याने भारतात दहशतवादी कारवाया घडवल्या आहेत.
असे पाकिस्तानमधील दहशतवादी
पाकमध्ये एकापाठोपाठ मारले जात असल्याने औरंगजेबही काही काळ हाफिजाबादमध्ये दडून होता, हे विशेष! औरंगजेबला भारत सरकारने वाँटेड घोषित केले आहे. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. भारतात घातपात घडविणार्या तसेच पाकिस्तानच्या आश्रयाला असलेल्या 48 मोस्ट वाँटेडस्चे जणू काऊंटडाऊन सुरू झालेले असून, आजअखेर भारताच्या 22 मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचा पाकिस्तानच्या भूमीवर खात्मा झाला आहे. हाफिज सईदचा भाऊ हमीद, अल बद्र कमांडर सय्यद खालिद, मुफ्ती कैसर, लष्कर कमांडर अक्रम गाझी, हिजबुल कमांडर बशीर, लष्करचे दहशतवादी सरदार हुसैन आणि रेहमान, जैश कमांडर दाऊद मलिक असे दहशतवादी अलीकडच्या काळात पाकमध्ये मारले गेले आहेत.
कोण मारले गेले? त्यांचा गुन्हा कोणता?
मौलाना रहिम (जैश) : पुलवामा दहशतवादी हल्ला
जाहिद मिस्त्री (हिजबुल) : कंधार विमान अपहरण
मुल्ला बर्हुर्र (जैश) : कुलभूषण जाधव यांचे अपहरण
ख्वाजा शाहिद : जम्मूमधील आर्मी कॅम्पवर हल्ला
परमजितसिंग पंजवार : पंजाबात दहशतवाद
शाहिद लतीफ (जैश) : पठाणकोट तळावर हल्ला
हंजला अदनान (तोयबा) : उधमपूर ‘बीएसएफ’ तळावर हल्ला
औरंगजेबच्या भारतविरोधी कारवाया
पाकमध्ये निधी गोळा करून औरंगजेब काश्मीरमधील दहशतवाद्यांना पाठवायचा.
‘आयएसआय’शी संधान साधून त्याने अफगाण दहशतवाद्यांनाही काश्मीरमध्ये घुसवले होते.
The post पाकमध्ये भारतविरोधी दहशतवाद्यांचे काऊंटडाऊन appeared first on पुढारी.
इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानात असलेल्या भारताच्या मोस्ट वाँटेडस्चे काऊंटडाऊन सुरूच असून, ताज्या घटनेत पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी औरंगजेब आलमगीर याचे इस्लामाबादेत अपहरण झाले आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा औरंगजेब हा हाफिजाबादहून डेरा गाझी गुलाम शहराकडे मोटारसायकलवरून जात असताना एका कारमधून काही बंदूकधारी तरुण आले आणि आलमगीरला उचलून नेले. एका निर्जन …
The post पाकमध्ये भारतविरोधी दहशतवाद्यांचे काऊंटडाऊन appeared first on पुढारी.