मध्य प्रदेशात अमानुष प्रकार! कुत्र्याच्या पिल्लाला जमीनीवर आदळून आदळून मारले

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मध्य प्रदेशातील गुनामध्ये एका व्यक्तीने क्रौर्याची परिसीमा ओलांडली आहे. त्याने पिल्लाला निर्दयपणे जमीनीवर आदळून आदळून मारले आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. या प्रकरणावर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह … The post मध्य प्रदेशात अमानुष प्रकार! कुत्र्याच्या पिल्लाला जमीनीवर आदळून आदळून मारले appeared first on पुढारी.
#image_title

मध्य प्रदेशात अमानुष प्रकार! कुत्र्याच्या पिल्लाला जमीनीवर आदळून आदळून मारले

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मध्य प्रदेशातील गुनामध्ये एका व्यक्तीने क्रौर्याची परिसीमा ओलांडली आहे. त्याने पिल्लाला निर्दयपणे जमीनीवर आदळून आदळून मारले आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. या प्रकरणावर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना ‘X’ वर टॅग करून या प्रकरणाची माहिती होती.
शिंदे यांच्या ट्विटवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही आरोपींवर कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि मध्य प्रदेश पोलिसांना प्लॅटफॉर्म X वर टॅग केले. या ट्वीटमध्ये जोतिरादित्य यांनी लिहिले की, ‘हे भयानक आणि त्रासदायक आहे. आरोपीला त्याच्या क्रूरतेची शिक्षा झालीच पाहिजे यात शंका नाही.’
या घटनेने मी दुखावलो आहे – मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लिहिले की, ‘या घटनेने मी खूप दुखावलो आहे. यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल. या रानटीपणाचा आम्ही तीव्र निषेध करतो. याला जबाबदार असलेल्या व्यक्तीला परिणाम भोगावे लागतील.’ यानंतर मुख्यमंत्री शिवराज यांनी आणखी एक ट्विट केले, ‘गुना जिल्ह्यातून समोर आलेली प्राणी क्रूराची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. याप्रकरणी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे, हे रानटी कृत्य अक्षम्य असून, या गुन्ह्यातील आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल.

Deeply disturbed by the horrifying incident. Swift and strict action will be taken to ensure justice is served. We unequivocally condemn such acts of barbarism, and the individual responsible will face the consequences. https://t.co/yYdCyKli64
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) December 10, 2023

This is horrifying and disturbing. There is no doubt that the man should be penalised for this barbarism. @ChouhanShivraj Ji, may please see.
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) December 10, 2023

हेही वाचलंत का?

Dharmarao Baba Atram : भोजनाच्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी परवानगी बंधनकारक: धर्मरावबाबा आत्राम
Vaibhav Patil On Jayant Patil : जयंत पाटील पालकमंत्री असताना न्याय मिळाला नाही: वैभव पाटील

The post मध्य प्रदेशात अमानुष प्रकार! कुत्र्याच्या पिल्लाला जमीनीवर आदळून आदळून मारले appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मध्य प्रदेशातील गुनामध्ये एका व्यक्तीने क्रौर्याची परिसीमा ओलांडली आहे. त्याने पिल्लाला निर्दयपणे जमीनीवर आदळून आदळून मारले आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. या प्रकरणावर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह …

The post मध्य प्रदेशात अमानुष प्रकार! कुत्र्याच्या पिल्लाला जमीनीवर आदळून आदळून मारले appeared first on पुढारी.

Go to Source