मराठा ओबीसी नेत्यांच्या वादाची मला वेदना होते : संभाजीराजे छत्रपती
संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : छत्रपतींचा एक वंशज म्हणून मला सध्या मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये जो वाद चालू आहे त्याचा मला मनापासून वेदना होत असल्याची खंत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
संभाजीराजे छत्रपती एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेरला आले होते. सर्वप्रथम स्वराज्य पक्षाच्या वतीने त्यांची ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर संगमनेर बस स्थानकावर सकल मराठी समाजाच्या वतीने 47 दिवसापासून सुरू असणाऱ्या साखळी उपोषणास त्यांनी भेट दिली. एक मराठा लाख मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्यांच्या समवेत स्वराज्याचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉ धनंजय जाधव जिल्हाप्रमुख आशिष कानवडे होते.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की सध्या मराठा समाज आणि ओबीसी समाजाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. त्यामुळे या दोन्ही समाजामध्ये एक मेकां विरुद्ध दरी निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांनी मराठा ओबीसी समाजामध्ये बाधा येणार नाही अशी वक्तव्य करू नये दोन्ही समाजाच्या नेत्यांनी वक्तव्य करत असतांना समाजाच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजे, असा सल्ला संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा ओबीसी समाजाच्या नेत्यांना दिला यावेळी छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष खंडू सातपुते यांनी सकल मराठा समाजाच्या उपोषणाबाबतची माहिती छत्रपती संभाजी राजे यांना दिली यावेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगमनेर बस स्थानकावर सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असणाऱ्या साखळी उपोषणास छत्रपती संभाजी राजे यांनी भेट दिली तेव्हा माध्यमांशी ते बोलत होते.
The post मराठा ओबीसी नेत्यांच्या वादाची मला वेदना होते : संभाजीराजे छत्रपती appeared first on पुढारी.
संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : छत्रपतींचा एक वंशज म्हणून मला सध्या मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये जो वाद चालू आहे त्याचा मला मनापासून वेदना होत असल्याची खंत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. संभाजीराजे छत्रपती एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेरला आले होते. सर्वप्रथम स्वराज्य पक्षाच्या वतीने त्यांची ढोल …
The post मराठा ओबीसी नेत्यांच्या वादाची मला वेदना होते : संभाजीराजे छत्रपती appeared first on पुढारी.