छत्तीसगडमध्ये दाेन उपमुख्यमंत्री, रमण सिंह हाेणार विधानसभा अध्यक्ष
पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड भाजप सरकारमधील नवीन सत्ताधीश कोण? या प्रश्नाचे उत्तर अखेर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठव्या दिवशी मिळाले. आज (दि.१०) राज्य भाजप कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठकीत छत्तीसगडचे नवे मुख्यंमत्री म्हणून विष्णुदेव साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. यानंतर राज्यात दोन उपमुख्यमंत्री होणार हेही निश्चित झाले. (Chhattisgarh deputy cm ) छत्तीसगडचे उपमुख्यमंत्रीपद अरुण साव आणि विजय शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यात सलग १५ वर्ष मुख्यमंत्रीपद संभाळलेले रमण सिंह यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद सोपविण्याचा निर्णय झाला आहे.
आज दुपारी मुख्यमंत्रीपदी नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर विष्णुदेव साय यांनी राजभवनात राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावाही केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ९० जागांपैकी 54 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला 35 जागांवर समाधान मानावे लागले. यंदाच्या निवडणुकीत भाजपने अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी राखीव असलेल्या २९ जागांपैकी १७ जागा जिंकल्या आहेत.
Vishnu Deo Sai meets Chhattisgarh Governor; stakes claim to form govt
Read @ANI Story | https://t.co/nOuKxtcfn1#Chhattisgarh #VishnuDeoSai #governor pic.twitter.com/GYV6yfgj4r
— ANI Digital (@ani_digital) December 10, 2023
हेही वाचा :
‘इंडिया’ आघाडीची आता १९ डिसेंबर रोजी बैठक : काँग्रेस नेते जयराम रमेश यांची माहिती
Looking Like A Wow : ‘जस्ट लुकिंग लाईक..’ ट्रेंडमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयलही
The post छत्तीसगडमध्ये दाेन उपमुख्यमंत्री, रमण सिंह हाेणार विधानसभा अध्यक्ष appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड भाजप सरकारमधील नवीन सत्ताधीश कोण? या प्रश्नाचे उत्तर अखेर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठव्या दिवशी मिळाले. आज (दि.१०) राज्य भाजप कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठकीत छत्तीसगडचे नवे मुख्यंमत्री म्हणून विष्णुदेव साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. यानंतर राज्यात दोन उपमुख्यमंत्री होणार हेही निश्चित झाले. (Chhattisgarh deputy cm ) छत्तीसगडचे उपमुख्यमंत्रीपद अरुण साव आणि …
The post छत्तीसगडमध्ये दाेन उपमुख्यमंत्री, रमण सिंह हाेणार विधानसभा अध्यक्ष appeared first on पुढारी.