भोजनाच्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी परवानगी बंधनकारक: धर्मरावबाबा आत्राम
गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: भोजन व्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांना अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी बंधनकारक करण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज (दि.१०) गडचिरोली येथे दिली. Dharmarao Baba Atram
गडचिरोली येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते झाले. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सकस अन्न मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. शिवाय लग्न व इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भोजनाची व्यवस्था असल्यास आयोजकांना अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्नधान्यातील भेसळ रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे आत्राम यांनी सांगितले. Dharmarao Baba Atram
अन्न व औषध प्रशासन विभागातील ७५० रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त अभिमन्यु काळे, जिल्हाधिकारी संजय मीणा उपस्थित होते. यावेळी आत्राम यांच्या हस्ते समाजकल्याण विभागाद्वारे संचालित मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले.
हेही वाचा
गडचिरोली : चित्तरंजनपूरमध्ये तिहेरी अपघातात दोघेजण ठार, तिघे जखमी
गडचिरोली : तलवारीने केक कापून हिरोगिरी करणे तरुणांना भोवले; आरमोरी पोलिसांची कारवाई
Maratha Reservation Protest: गडचिरोली जिल्ह्यात ४९ हजार ६९१ कुणबी नोंदी
The post भोजनाच्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी परवानगी बंधनकारक: धर्मरावबाबा आत्राम appeared first on पुढारी.
गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: भोजन व्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांना अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी बंधनकारक करण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज (दि.१०) गडचिरोली येथे दिली. Dharmarao Baba Atram गडचिरोली येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते झाले. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सकस अन्न मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे बळकटीकरण करण्यात येणार …
The post भोजनाच्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी परवानगी बंधनकारक: धर्मरावबाबा आत्राम appeared first on पुढारी.