पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज (दि.१०) मुंबईत ‘एक भारत सारी वॉकथॉन’ला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलेल्या ट्रेंडचा संदर्भ देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. (Looking Like A
Wow)
यावेळी गोयल उपस्थितांना म्हणाले की, “चला आता वॉकथॉन सुरू करूया… मला एवढेच सांगायचे आहे की, ही ‘जस्ट लुकिंग लाईक
अ वाॅव’ आहे. खूप सुंदर, खूप मोहक दिसणारे…”, आपल्या देशातील विविधता आज या वॉकथॉनमध्ये पाहायला मिळत असून मोठ्या संख्येने महिला उत्साहाने सहभागी होत आहेत. यावेळी गोयल यांना उपस्थित महिलांनी टाळ्या वाजवून दाद दिली. भारतातील हातमाग साडी संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे. देशभरातील महिलांना त्यांच्या साड्या परिधान करण्याच्या पद्धती आणि भारतातील विविधतेतील एकता ही परंपरा कायम राहावी, या उद्देशाने वस्त्रोद्योग मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अभिनेत्री सोनाली बेंद्रे, रुपाली गांगुली आदीसह सेलिब्रिटींची यावेळी उपस्थिती होती.
“वोकल फॉर लोकल” या संकल्पनेमुळे पारंपरिक वस्त्रांना प्रोत्साहन मिळेल आणि महिलांमध्ये तंदुरुस्तीबद्दल जागरुकता वाढले. त्यांना निरोगी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे मंत्रालयाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
Looking Like A Wow “जस्ट लुकिंग लाईक वाॅव!”
दिल्लीस्थित उद्योगपती जसमीन कौर यांचा “जस्ट लुकिंग लाईक …!” हा व्हिडिओ ऑक्टोबरमध्ये व्हायरल झाल्यानंतर हा ट्रेंड सुरू झाला. या व्हिडिओमध्ये कौरने कपड्यांचे वर्णन करण्यासाठी “फक्त व्वावसारखे दिसते” हा शब्द वारंवार वापरला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. लोकांनीही त्यांच्या आवडत्या पोशाखांपासून त्यांच्या दैनंदिन व्यवहारापर्यंत प्रत्येक गोष्टींचे वर्णन करण्यासाठी हा शब्दप्रयोग वापरण्यास सुरुवात केली. अनेक चित्रपट तारे, राजकारणी आणि क्रिकेटपट्टूंनी यावर रील्स शेअर केल्या आहेत.
Piyush Goyal joins “so beautiful, so elegant, looking like a wow” trend; Watch video
Read @ANI Story | https://t.co/quzzEpR1FN#PiyushGoyal #Walkathon #LookingLikeAWow pic.twitter.com/PJlbhRp1tY
— ANI Digital (@ani_digital) December 10, 2023
हेही वाचा
अजित पवार यांच्या बैठकीतही कांदा प्रश्नावर तोडगा नाही ; आता मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा
नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा : मुख्यमंत्र्यांचे पियुष गोयल यांना पत्र
पियुष गोयल : ‘मोदी सरकारच्या धोरणांनी देशाची आर्थिक, गुंतवणूक क्षेत्रात दमदार कामगिरी’
The post ‘जस्ट लुकिंग लाईक..’ ट्रेंडमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयलही appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज (दि.१०) मुंबईत ‘एक भारत सारी वॉकथॉन’ला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलेल्या ट्रेंडचा संदर्भ देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. (Looking Like A Wow) यावेळी गोयल उपस्थितांना म्हणाले की, “चला आता वॉकथॉन सुरू करूया… मला एवढेच सांगायचे आहे की, ही ‘जस्ट लुकिंग लाईक …
The post ‘जस्ट लुकिंग लाईक..’ ट्रेंडमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयलही appeared first on पुढारी.