न्यूझीलंड विरूद्ध टॉस जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय

न्यूझीलंड विरूद्ध टॉस जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अतिशय उत्कृष्ट झाली आहे. संघाने आतापर्यंतचे सर्व नऊ सामने जिंकले आहेत. आज (दि.१५) उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, भारताने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. IND vs NZ Semi Final
विश्वचषक स्पर्धेतील गट फेरीचे सामने संपले असून, पहिला उपांत्य सामनाआज होणार आहे. या सामन्यात यजमान भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. चार वर्षांनंतर या फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. गेल्या वेळी 2019 मध्ये किवी संघाने भारतीय क्रिकेटप्रेंमीचे स्वप्न भंग करून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. २०११ नंतर अंतिम फेरीत पोहोचण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. IND vs NZ Semi Final
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजांनी नऊ सामन्यांमध्ये एकूण 90 पैकी 86 विकेट्स घेतल्या आहेत. उपांत्य फेरीत पोहोचलेल्या इतर संघांशी तुलना केल्यास भारतीय गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. या यादीत दक्षिण आफ्रिका ८५ विकेट्ससह दुस-या, ऑस्ट्रेलिया ७६ विकेटसह तिसर्‍या आणि न्यूझीलंड ६९ विकेटसह चौथ्या स्थानावर आहे.

ICC World Cup | India win the toss and elect to bat first against New Zealand in the first Semi Final, in Mumbai. #IndiaVsNewZealand pic.twitter.com/8DiJ65r7Vz
— ANI (@ANI) November 15, 2023

हेही वाचा

IND vs NZ World Cup 2023 semi-final | प्रेशर को मारो गोली..! दबाव हाताळण्यास टीम इंडिया सक्षम : द्रविड
भारत-न्यूझीलंड सामना: धमकीच्या पोस्टप्रकरणी लातूरच्या तरूणाला अटक
ICC World Cup Prize : वर्ल्डकप जिंकणा-या संघाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या आकडेवारी

The post न्यूझीलंड विरूद्ध टॉस जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अतिशय उत्कृष्ट झाली आहे. संघाने आतापर्यंतचे सर्व नऊ सामने जिंकले आहेत. आज (दि.१५) उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, भारताने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. IND vs NZ Semi Final विश्वचषक स्पर्धेतील गट फेरीचे …

The post न्यूझीलंड विरूद्ध टॉस जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय appeared first on पुढारी.

Go to Source