भुवनेश्वर; वृत्तसंस्था : ऑलिव्ह रिडले कासव (Olive Ridley Turtles) हे ओडिशातील व्हिलर बेटाचे वैभव! नोव्हेंबर ते मे हा रिडले कासवांचा घरटी बांधण्याचा काळ… यावर्षी अंदाजे ५ लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी या बेटावर घरटी केली आहेत. हे बेट म्हणजे डीआरडीओ या देशाच्या प्रमुख संरक्षण संशोधन संस्थेचे क्षेपणास्त्र चाचणीचे हक्काचे ठिकाण, पण कासवांचे नुकसान नको म्हणून व्हिलर बेटावर डीआरडीओने पुढील ३ महिन्यांसाठी क्षेपणास्त्र चाचणी थांबवली आहे. (DRDO)
यंदा अंदाजे ५ लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी येथे घरटी बांधली आहेत. क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान प्रखर प्रकाश आणि अतिआवाजामुळे कासवांना समस्या उद्भवू नये म्हणून आम्ही क्षेपणास्त्र चाचणी कार्यक्रमांना या बेटावर स्थगिती दिली, असे डीआरडीओकडून सांगण्यात आले. ओडिशा सरकारने १ नोव्हेंबर २०२३ ते ३१ मे २०२४ दरम्यान कासव घरटी क्षेत्रात २० कि.मी. परिघात मासेमारीवर बंदी घातली आहे. (DRDO)
हेही वाचा :
आता अमेरिकेच्या सैन्यालाही चंद्रामध्ये रस!
अडीच टन वजनाचा अजस्र मासा!
सिंधुदुर्ग : देवगड समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील सहा मुले बुडाली, चौघांचा मृत्यू
The post ‘डीआरडीओ’ची भूतदया! कासवांसाठी ३ महिने क्षेपणास्त्र चाचणी स्थगित appeared first on पुढारी.
भुवनेश्वर; वृत्तसंस्था : ऑलिव्ह रिडले कासव (Olive Ridley Turtles) हे ओडिशातील व्हिलर बेटाचे वैभव! नोव्हेंबर ते मे हा रिडले कासवांचा घरटी बांधण्याचा काळ… यावर्षी अंदाजे ५ लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी या बेटावर घरटी केली आहेत. हे बेट म्हणजे डीआरडीओ या देशाच्या प्रमुख संरक्षण संशोधन संस्थेचे क्षेपणास्त्र चाचणीचे हक्काचे ठिकाण, पण कासवांचे नुकसान नको म्हणून व्हिलर …
The post ‘डीआरडीओ’ची भूतदया! कासवांसाठी ३ महिने क्षेपणास्त्र चाचणी स्थगित appeared first on पुढारी.