एखाद्याला कसे संपवायचे ते उद्धव ठाकरेंकडून शिकावे : रामदास कदम

सासवड : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत घोषणा केली होती की, ज्या दिवशी मला काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाण्याची वेळ येईल त्या दिवशी शिवसेना पक्ष बंद करीन. बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेस व राष्ट्रवादीशी संघर्ष केला पण कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात नालायक मुलगा म्हणून उद्धव ठाकरे यांची … The post एखाद्याला कसे संपवायचे ते उद्धव ठाकरेंकडून शिकावे : रामदास कदम appeared first on पुढारी.
#image_title

एखाद्याला कसे संपवायचे ते उद्धव ठाकरेंकडून शिकावे : रामदास कदम

सासवड : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत घोषणा केली होती की, ज्या दिवशी मला काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाण्याची वेळ येईल त्या दिवशी शिवसेना पक्ष बंद करीन. बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेस व राष्ट्रवादीशी संघर्ष केला पण कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात नालायक मुलगा म्हणून उद्धव ठाकरे यांची नोंद होईल. एखाद्याला कसं संपवायचं ते उद्धव ठाकरेंकडून शिकावं. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत शरद पवारांना शिवसेना फोडता आली नाही, परंतु शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना जवळ घेऊन शिवसेना फोडली, अशी टीका माजी पर्यावरणमंत्री, शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे.
सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात शनिवारी (दि.9) शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वात पुरंदर तालुक्यातील शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा, पदनियुक्ती पत्र वाटप आणि नूतन सभासद नोंदणी शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात कदम बोलत होते. या वेळी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या ज्योती वाघमारे, पुणे जिल्हाप्रमुख शिवसेना दिलीप यादव, महिला आघाडीच्या नेत्या डॉ. ममता शिवतारे लांडे, युवासेना जिल्हाप्रमुख तुषार हंबीर, उपजिल्हाप्रमुख रमेश इंगळे, उपजिल्हाप्रमुख अतुल म्हस्के, लोकसभा संपर्कप्रमुख अ‍ॅड. गीतांजली ढोणे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मंदार जगताप, शिवसेना तालुकाप्रमुख हरिभाऊ लोळे, युवासेना तालुकाप्रमुख अ‍ॅड. नितीन कुंजीर, विधानसभा तालुका प्रमुख समीर जाधव आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास कंपनीने नेमलेल्या सर्वेक्षण संस्थेने तालुक्यातील अनेक जागांचा अभ्यास केल्यानंतर पारगाव व बाजूच्या सहा गावांची जागा पसंत केली. त्यानुसार प्रस्ताव दाखल करीत त्यास सर्व विभागांच्या मान्यतादेखील मिळवल्या. पण दुर्दैवाने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवतारे यांचा पराभव झाल्यानंतर हे विमानतळ बारामतीला पळविण्यासाठी हालचाली झाल्या. पुरंदरचे आमदार हे पवारांचे मांडलिक असल्याने यात ते यशस्वीही झाले. पण योगायोगाने राज्यात सत्ताबदल होऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेतून बाहेर फेकली गेली.
शिवतारे यांनी तत्काळ हालचाली करीत बारामतीला पळविण्यात आलेला हा प्रकल्प रद्द करून तो पुन्हा पुरंदर तालुक्यातील मूळ नियोजित जागी मंजूर केला. या विमानतळामध्ये प्रवासी वाहतूक, कार्गो हब आणि लॉजिस्टिक पार्क अशा असंख्य विकासाच्या संधी आहेत. यातून लाखो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होत असून भविष्याच्या शेकडो वर्षांचा विचार करता हे महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर होणारे काम आहे, असेही कदम यांनी सांगितले. याप्रसंगी माणिक निंबाळकर, प्रवीण लोळे, मिलिंद इनामके, मंगेश भिंताडे, दत्ता काळे, पै. विजय ढोणे, नीलेश जगताप, प्रशांत वांढेकर, सागर मोकाशी, अविनाश बडदे, विवेक दाते आदी उपस्थित होते.
आमदारांवर निशाणा
पुरंदरमधील गुंजवणीच्या पाण्यासाठी लढा दिला, माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात अडीच वर्षात गुंजवणी धरण पूर्ण केले. दोन वर्षे कोर्ट – कचेर्‍या करण्यात वेळ गेला व लार्सन अँड टुब—ो या कंपनीला टेंडरही माझ्या कार्यकाळात दिले, परंतु विद्यमान आमदारांनी विधानसभेच्या निवडणुकीत स्व-खर्चाने पुरंदर उपसा योजना चालवण्याची 1200 कोटी रुपयांची घोषणा केली होती त्याचे काय झाले, असे टीकास्त्र माजी राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी आमदार संजय जगताप यांचे नाव न घेता सोडले.
पुरंदरला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार
गेल्या दोन पंचवार्षिकला विजय शिवतारे आमदार, मंत्री असताना तालुक्यात जी विकासाची गंगा वाहिली, मात्र गेल्या चार वर्षात तालुक्याचा विकास रखडला गेल्याने तालुका दहा वर्षे मागे पडला. मागील 2019 ला झालेली चूक 2024 ला सुधारून पुन्हा विजय शिवतारेना विधानसभेत पाठवा. पुरंदरला कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे रामदास कदम यांनी मेळाव्यात सांगितले.
हेही वाचा

दहा कपाटात 300 कोटी! 37 पोती रोकड बाकी!!
Weather Update : पाऊस पूर्ण ओसरला; उद्यापासून थंडी
उत्तर प्रदेशातील सोने चोरीची पाळेमुळे सांगली जिल्ह्यापर्यंत

The post एखाद्याला कसे संपवायचे ते उद्धव ठाकरेंकडून शिकावे : रामदास कदम appeared first on पुढारी.

सासवड : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत घोषणा केली होती की, ज्या दिवशी मला काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाण्याची वेळ येईल त्या दिवशी शिवसेना पक्ष बंद करीन. बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेस व राष्ट्रवादीशी संघर्ष केला पण कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात नालायक मुलगा म्हणून उद्धव ठाकरे यांची …

The post एखाद्याला कसे संपवायचे ते उद्धव ठाकरेंकडून शिकावे : रामदास कदम appeared first on पुढारी.

Go to Source