कोल्हापूर: शिंपेच्या अमृता पाटीलला राष्ट्रीय खो खो स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार
सरूड : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरची उदयोन्मुख खेळाडू कु. अमृता बाबासाहेब पाटील हिने नाशिक येथे पंचवटी विभागीय क्रीडा संकुलच्या मैदानावर झालेल्या ६७ व्या १७ वर्षाआतील शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र राज्य संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धा संयोजकांनी या वैयक्तिक सुवर्ण कामगिरीची दखल घेत कु. अमृता हिला उत्कृष्ट आक्रमक खेळाडूचा पुरस्कार बहाल केला आहे. कु. अमृता बाबासाहेब पाटील ही शाहूवाडी तालुक्यातील शिंपे गावची रहिवासी आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य संघात झालेली निवड सार्थ ठरविताना कु. अमृता हिने स्पर्धेत सलामीला पंजाब संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तब्बल सात गडी बाद केले. तिने अखंड स्पर्धेत अशाच आक्रमक खेळावर भर देत लक्षवेधी कामगिरीत सातत्य राखले होते. अंतिम सामन्यातही गुजरात संघाचे तब्बल ८ खेळाडू तिने लीलया बाद केले. साहजिकच देशभरातून सहभागी झालेल्या २७ राज्यांच्या संघातील खेळाडूंमधून कु. अमृता पाटील हिला उत्कृष्ट आक्रमक खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले. सद्या ती शिंगणापूर-कोल्हापूर येथील राजर्षी शाहू विद्यानिकेतन व शासकीय निवासी क्रीडा प्रशाला येथे १० वी च्या वर्गात शिकत आहे. या तिच्या कामगिरीमुळे कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच शाहूवाडी तालुक्याचे नांव क्रीडा क्षेत्रात ठळक प्रसिद्धीच्या झोतात आले आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी कु. अमृता हिच्यासह प्रशिक्षक भीमराव भांदिगरे, वडील बाबासाहेब पाटील यांचे विशेष अभिनंदन केले.
हेही वाचा
कोल्हापूर : 13 कारखान्यांचे 200 कोटींचे उत्पन्न घटणार
कोल्हापूर : सावे ग्रामपंचायत उपसरपंचपदी प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड
कोल्हापूर : ‘बिद्री’ने वाढविली राजकीय इर्ष्या
The post कोल्हापूर: शिंपेच्या अमृता पाटीलला राष्ट्रीय खो खो स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार appeared first on पुढारी.
सरूड : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरची उदयोन्मुख खेळाडू कु. अमृता बाबासाहेब पाटील हिने नाशिक येथे पंचवटी विभागीय क्रीडा संकुलच्या मैदानावर झालेल्या ६७ व्या १७ वर्षाआतील शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र राज्य संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धा संयोजकांनी या वैयक्तिक सुवर्ण कामगिरीची दखल घेत कु. अमृता हिला उत्कृष्ट आक्रमक खेळाडूचा पुरस्कार बहाल …
The post कोल्हापूर: शिंपेच्या अमृता पाटीलला राष्ट्रीय खो खो स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार appeared first on पुढारी.