वेगन आहारामुळे घटते खराब कोलेस्टेरॉल
लंडन : वेगन आहार (Vegan diet) म्हणजे आहारातून डेअरी (दूध, पनीर, दही) आणि पोल्ट्री (अंडी, चिकन) यांसह कोणत्याही प्रकारचे प्राण्यांपासून मिळणारे अन्न पूर्णपणे काढून टाकणे आणि फक्त वनस्पतींवर आधारित पदार्थांचे सेवन करणे. एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, वेगन किंवा वनस्पती आधारित आहार खराब कोलेस्टेरॉल किंवा कमी घनता असलेले लिपोप्रोटिन (एलडीएल-कोलेस्टेरॉलचा एक प्रकार) व वजन कमी करतो. (Vegan diet)
स्टॅन्फोर्ड युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी आठ आठवड्यांच्या आणि २२ जुळ्या मुलांमध्ये वेगन आहाराची तुलना ‘ओमनीवोरोस’ आहाराबरोबर केली. ‘ओमनीवोरोस’ आहारामध्ये वनस्पती, दूध, अंडी, मांस, मासे अशा सर्व प्रकारच्या आहाराचा समावेश होतो. संशोधनात जुळ्यांपैकी एका मुलाला वेगन आहार देण्यात आला; तर दुसर्याला सर्व प्रकाराचा आहार देण्यात आला. जामा नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षांनुसार वेगन गटामध्ये कोलेस्टेरॉल आणि इन्सुलिनची पातळी अधिक चांगली होती व त्याने अधिक वजन कमी केले. (Vegan diet)
हेही वाचा :
कांजिण्या संसर्गजन्य आजार; बचाव आणि उपाय
धोक्याचा इशारा..! शॅम्पू करु शकतो ‘लिव्हर’ खराब ! जाणून घ्या नवीन संशोधन
तुमचा स्वभाव ठरवताे आजार!, जाणून घ्या कारण आणि उपाय
The post वेगन आहारामुळे घटते खराब कोलेस्टेरॉल appeared first on पुढारी.
लंडन : वेगन आहार (Vegan diet) म्हणजे आहारातून डेअरी (दूध, पनीर, दही) आणि पोल्ट्री (अंडी, चिकन) यांसह कोणत्याही प्रकारचे प्राण्यांपासून मिळणारे अन्न पूर्णपणे काढून टाकणे आणि फक्त वनस्पतींवर आधारित पदार्थांचे सेवन करणे. एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, वेगन किंवा वनस्पती आधारित आहार खराब कोलेस्टेरॉल किंवा कमी घनता असलेले लिपोप्रोटिन (एलडीएल-कोलेस्टेरॉलचा एक प्रकार) …
The post वेगन आहारामुळे घटते खराब कोलेस्टेरॉल appeared first on पुढारी.