राजकीय फूट पाडणार्‍यांपासून महिलांनी सावध राहावे : PM मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आजकाल काही लोक महिलांमध्‍ये तेढ निर्माण करत आहेत. महिलांनी राजकीय फूट पाडणार्‍यांपासून सावध राहावे, असे आवाहन करत सर्व महिलांची एक जात इतकी मोठी आहे की, त्या एकत्र येऊन कोणतेही आव्हान पेलू शकतात, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांनी आज (दि.९) व्‍यक्‍त केला. ‘विकसित भारत संकल्प’च्या महिला लाभार्थ्यांशी … The post राजकीय फूट पाडणार्‍यांपासून महिलांनी सावध राहावे : PM मोदी appeared first on पुढारी.
#image_title

राजकीय फूट पाडणार्‍यांपासून महिलांनी सावध राहावे : PM मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आजकाल काही लोक महिलांमध्‍ये तेढ निर्माण करत आहेत. महिलांनी राजकीय फूट पाडणार्‍यांपासून सावध राहावे, असे आवाहन करत सर्व महिलांची एक जात इतकी मोठी आहे की, त्या एकत्र येऊन कोणतेही आव्हान पेलू शकतात, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांनी आज (दि.९) व्‍यक्‍त केला. ‘विकसित भारत संकल्प’च्या महिला लाभार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
राजकीय विभाजनाविरुद्ध सर्व महिलांनी सावध राहावे
गरीब, महिला, युवक आणि शेतकरी या चार सर्वात मोठ्या जाती आहेत ज्यांच्या प्रगतीमुळे विकसित भारत होईल. सर्व महिलांनी एकत्र राहायला हवे. आजकाल काही लोक महिलांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. अशा राजकीय विभाजनाविरुद्ध सर्व महिलांनी सावध राहावे. त्‍यांनी फूट पाडणाऱ्या राजकारणाबद्दल सावध राहण्याचे आवाहनही त्‍यांनी केले. बिहारमधील दरभंगा येथील प्रियंका यादव यांच्याशी संवाद साधताना त्यांनी वरील भाष्य केले. केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांनी कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर प्रियंका यादव यांच्‍या कुटुंबाला मोफत धान्य आणि रोख लाभ मिळाल्याने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कशी मदत केली, हेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी नमूद केले.

STORY | PM Modi says women one big caste, warns against attempts to create rift
READ: https://t.co/WOBw71xeJ7 pic.twitter.com/gJjM8KuM9L
— Press Trust of India (@PTI_News) December 9, 2023

मोदींनी लाभार्थ्यांशी साधला संवाद
कोणतीही कल्याणकारी योजना यशस्वी होण्यासाठी ती प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला. असे कार्यक्रम पूर्वी फक्त कागदपत्रे आणि रिबन कापण्याच्या समारंभांपुरते मर्यादित होते, असा टोलाही त्‍यांनी विरोधकांना लगावला.
यावेळी नाझिया नजीर, शेख पुरा, जम्मू आणि काश्मीर येथील ‘व्‍हीबीएसवाय’ लाभार्थी, दूध विक्रेत्याने सांगितले की, ‘जल जीवन मिशन’ त्यांच्या गावासाठी कायापालट करणारे ठरले आहे, स्वच्छ आणि सुरक्षित नळाच्या पाण्याचा पुरवठा त्यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे.
 मोदींनी इतर लाभार्थ्यांशी संवाद साधला त्यामध्ये मोना यांचा समावेश हाेता. माेना या ट्रान्सजेंडर आहेत. त्‍या मूळच्‍या रांची येथील आहेत. ‘पीएम स्वानिधी योजने’द्वारे 10,000 रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर चंदीगडमध्ये त्‍यांनी चहाचे दुकान सुरु केले आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत विकास पोहोचेल याची खात्री करण्यासाठी ‘सबका साथ सबका विकास’ या त्यांच्या सरकारच्या भावनेला अधोरेखित करून सरकारी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अधिक ट्रान्सजेंडर लोकांच्या गरजेचे असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
हेही वाचा :

खासदार दानिश अली ‘बसपा’तून निलंबित, पक्षविरोधी कारवायांमध्‍ये सहभागी असल्‍याचा ठपका
Chhattisgarh new chief minister : छत्तीसगडचा मुख्‍यमंत्री उद्या ‍ठरणार? विधिमंडळ पक्ष बैठकीत निर्णयाची शक्‍यता

 
 
The post राजकीय फूट पाडणार्‍यांपासून महिलांनी सावध राहावे : PM मोदी appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आजकाल काही लोक महिलांमध्‍ये तेढ निर्माण करत आहेत. महिलांनी राजकीय फूट पाडणार्‍यांपासून सावध राहावे, असे आवाहन करत सर्व महिलांची एक जात इतकी मोठी आहे की, त्या एकत्र येऊन कोणतेही आव्हान पेलू शकतात, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांनी आज (दि.९) व्‍यक्‍त केला. ‘विकसित भारत संकल्प’च्या महिला लाभार्थ्यांशी …

The post राजकीय फूट पाडणार्‍यांपासून महिलांनी सावध राहावे : PM मोदी appeared first on पुढारी.

Go to Source