Nagar : उत्खनन कारवाईत अधिकार्यांचा असमन्वय
अकोले: पुढारी वृत्तसेवा : अकोले शहरासह, कोतुळ, भंडारदरा, ब्राम्हणवाडा, समशेरपूर, कळस परिसरात अवैध गौण खनिजाची वाहतूक वाढली आहे. गत आठवड्यात उपविभागीय अधिकारर्यांनी अकोले परिसरात गौण खनिजाचे बेकायदेशीररीत्या उत्खनन व वाहतूक करणार्या 4 वाहनांसह ट्रॅक्टर अकोले महसूलच्या ताब्यात दिल्याने अकोले महसूलचे या प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, वाहने तहसील कार्यालय आवारात उभी केली. वाहन मालकांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे नायब तहसीलदार बाळासाहेब मुळे म्हणाले, मात्र महसूलकडून सुरू असलेल्या कारवाईत सातत्य नसल्याने अवैध गौण खनिजाची वाहतूक करणार्यांचे पुन्हा फावल्याचे दिसत आहे.
दगड, माती, मुरूम आदींचे उत्खनन करण्यासाठी पर्यावरण समितीचा परवाना अनिवार्य आहे. वाळू उपशावर बंदी घातली,पण माती,दगड,मुरमाची अद्याप चोरट्या पध्दतीने वाहतूक सुरू आहे. याला काही ठिकाणी महसूलचा‘आशीर्वाद’ मिळाल्याची चर्चा आहे. अनधिकृतरीत्या गौण खनिजाची बेकायदा वाहतूकही मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. गौण खजिन कायदेशीररीत्या रॉयल्टी भरून वाहतूक करणे बंधनकारक आहे, मात्र रॉयल्टी भरून वाहतूक करणार्यांचे प्रमाण अकोले शहरासह ग्रामीण भागातअत्यल्प आहे. निव्वळ दंडात्मक कारवाई झाल्यामुळे यावाहतुकीला आळा बसणे अवघड झाले आहे.
महसूलने गौण खनिजाची बेकायदा वाहतूक करणार्यांवर कारवाईसाठी विविध पथके नेमली.मंडल अधिकारी, तलाठ्याच्यामार्फत वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारण्यात आला. काही ठिकाणी प्रत्यक्ष भेटीतून कारवाई होते, मात्र यात सातत्य दिसत नाही.अकोले तालुक्यात कारवाई करताना महसूल अधिकार्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे बेकायदेशीररीत्या गौण खनिज वाहतूक सर्रास सुरु आहे. महसूलच्या कारवाईपासून पळ काढण्यासाठी गौण खनिजाची वाहतूक करणारी वाहने भरधाव चालवली जातात. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले. शासनाचा महसूल बुडवून पर्यावरणाची हानी होत आहे.
The post Nagar : उत्खनन कारवाईत अधिकार्यांचा असमन्वय appeared first on पुढारी.
अकोले: पुढारी वृत्तसेवा : अकोले शहरासह, कोतुळ, भंडारदरा, ब्राम्हणवाडा, समशेरपूर, कळस परिसरात अवैध गौण खनिजाची वाहतूक वाढली आहे. गत आठवड्यात उपविभागीय अधिकारर्यांनी अकोले परिसरात गौण खनिजाचे बेकायदेशीररीत्या उत्खनन व वाहतूक करणार्या 4 वाहनांसह ट्रॅक्टर अकोले महसूलच्या ताब्यात दिल्याने अकोले महसूलचे या प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, वाहने तहसील कार्यालय आवारात उभी केली. …
The post Nagar : उत्खनन कारवाईत अधिकार्यांचा असमन्वय appeared first on पुढारी.