ठाणे : कल्याणच्या कार्यशाळेत भीषण आगीत केडीएमटीच्या दोन बस जळून खाक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या सिंधीगेट येथील कार्यशाळेला शनिवारी भल्या पहाटे भीषण आग लागली. या आगीत सदर कार्यशाळेत दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या दोन बस जळून खाक झाल्या. कार्यशाळेच्या इमारतीचे आगीत नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने आग विझविण्याचे काम सुरू केले. … The post ठाणे : कल्याणच्या कार्यशाळेत भीषण आगीत केडीएमटीच्या दोन बस जळून खाक appeared first on पुढारी.
#image_title

ठाणे : कल्याणच्या कार्यशाळेत भीषण आगीत केडीएमटीच्या दोन बस जळून खाक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या सिंधीगेट येथील कार्यशाळेला शनिवारी भल्या पहाटे भीषण आग लागली. या आगीत सदर कार्यशाळेत दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या दोन बस जळून खाक झाल्या. कार्यशाळेच्या इमारतीचे आगीत नुकसान झाले.
आगीची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने आग विझविण्याचे काम सुरू केले. या कार्यशाळेच्या बाजूला बसमध्ये डिझेल भरण्याच्या भूमिगत टॅंक आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्यशाळेच्या चारही बाजूंनी फोगयुक्त पाण्याचा मारा सुरू ठेवण्यात आला. शिवाय आग इतरत्र पसरणार नाही याची काळजी घेण्यात आली. कार्यशाळेत दुरुस्तीच्या कामासाठी इंधनाचा वापर सुरू असतो. या इंधननाने अचानक पेट घेतला. त्यानंतर आगीने काही क्षणांत रौद्ररूप धारण केले. बहुदा इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून काढण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
The post ठाणे : कल्याणच्या कार्यशाळेत भीषण आगीत केडीएमटीच्या दोन बस जळून खाक appeared first on पुढारी.

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या सिंधीगेट येथील कार्यशाळेला शनिवारी भल्या पहाटे भीषण आग लागली. या आगीत सदर कार्यशाळेत दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या दोन बस जळून खाक झाल्या. कार्यशाळेच्या इमारतीचे आगीत नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने आग विझविण्याचे काम सुरू केले. …

The post ठाणे : कल्याणच्या कार्यशाळेत भीषण आगीत केडीएमटीच्या दोन बस जळून खाक appeared first on पुढारी.

Go to Source