Fighter Cast Fees : फायटर चित्रपटासाठी कुणी किती रुपये घेतले? ऋतिकने घेतली तगडी रक्कम
पुढारी ऑनलाईन डेस्क : फायटर चित्रपटात ऋतिक रोशन, अनिल कपूर आणि दीपिका पादुकोणसोबत करण सिंह ग्रोवर आणि अक्षय ओबेरॉय प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. (Fighter Cast Fees) जाणून घ्या चित्रपटाच्या स्टार कास्टचे मानधन… (Fighter Cast Fees)
संबंधित बातम्या –
बाळूमामाच्या नावानं चांगभलं : सुरेखा कुडची अक्काच्या भूमिकेत
New TV Serial : श्रीमद् रामायण मालिकेचा प्रोमो रिलीज, यादिवशी भेटीला
Chennai Flood : रजनीकांत यांच्या गार्डन हाऊसमध्ये पुराचे पाणी शिरले (Video Viral)
रिपोर्टनुसार, ऋतिक रोशनने ५० कोटी रुपये मानधन घेतले आहे. दीपिका पादुकोणला १५ कोटी रुपये मिळाले आहेत. ऋतिक – दीपिका शिवाय अनिल कपूर यांना ७ कोटी रुपये मिळाले आहेत. करण सिंह ग्रोवरला २ कोटी आणि अक्षय ओबेरॉयला एक कोटी रुपये मानधन मिळाले आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटाचे बजेट २५० कोटी रुपये आहे.
हर उडान वतन के नाम…
चित्रपट फायटरचा टीझर एक मिनट १३ सेकंदाचा आहे, जो खूप शानदार आहे. या टीजरमध्ये एका फायटर जेट्सचे ॲक्शन सीक्वेन्स आहेत. केवळ हवाच नाही तर जमिनीवरदेखील ॲक्सन्स पाहायला मिळत आहे.
देशभक्ती जागृत करणारा हा टीजर आहे. टीजरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, यमध्ये दीपिका पादुकोण आणि ऋतिक रोशन रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. दोघे टीजरमध्ये लिपलॉक करताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर ऋतिक रोशनने फायटरचा टीझर शेअर करत लिहिले आहे – हर उडान वतन के नाम. टीझरच्या शेवटी ऋतिक रोशन विमानातून उतरलेले दिसत आहेत. त्याच्या हातात एक तिरंगा दिसत आहेत.
२५ जानेवारी रिलीज होणार फायटर
ऋतिक रोशन, अनिल कपूर, दीपिका पादुकोणसोबत करण सिंह ग्रोवर आणि अक्षय ओबेरॉयदेखील दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. याआधी त्यांनी ऋतिक रोशनसोबत बँग बँग आणि वॉर यासारखे दमदार चित्रपट बनवले आहेत. संगीत विशाल-शेखर यांचे आहे. लिरिक्स कुमार यांचे आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी, २०२४ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.
View this post on Instagram
A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)
View this post on Instagram
A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)
The post Fighter Cast Fees : फायटर चित्रपटासाठी कुणी किती रुपये घेतले? ऋतिकने घेतली तगडी रक्कम appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : फायटर चित्रपटात ऋतिक रोशन, अनिल कपूर आणि दीपिका पादुकोणसोबत करण सिंह ग्रोवर आणि अक्षय ओबेरॉय प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. (Fighter Cast Fees) जाणून घ्या चित्रपटाच्या स्टार कास्टचे मानधन… (Fighter Cast Fees) संबंधित बातम्या – बाळूमामाच्या नावानं चांगभलं : सुरेखा कुडची अक्काच्या भूमिकेत New TV Serial : श्रीमद् रामायण मालिकेचा प्रोमो रिलीज, यादिवशी …
The post Fighter Cast Fees : फायटर चित्रपटासाठी कुणी किती रुपये घेतले? ऋतिकने घेतली तगडी रक्कम appeared first on पुढारी.