माघारीच्या निर्णयानंतर आजरा कारखान्याची निवडणूक लढवणे राष्ट्रवादीचे अपयश : सतेज पाटील

आजरा: पुढारी वृत्तसेवा : आजरा कारखाना बिनविरोधच्या चर्चेत राष्ट्रवादीने माघारीच्या निर्णयानंतर पुन्हा निवडणूक लढण्याचा निर्णय घेणे, हे राष्ट्रवादी आघाडीचे अपयश असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी केली. आ. पाटील श्री चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारसभेसाठी आले होते. त्यानंतर आज (दि.९) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. Satej Patil आ. पाटील म्हणाले की, … The post माघारीच्या निर्णयानंतर आजरा कारखान्याची निवडणूक लढवणे राष्ट्रवादीचे अपयश : सतेज पाटील appeared first on पुढारी.
#image_title

माघारीच्या निर्णयानंतर आजरा कारखान्याची निवडणूक लढवणे राष्ट्रवादीचे अपयश : सतेज पाटील

आजरा: पुढारी वृत्तसेवा : आजरा कारखाना बिनविरोधच्या चर्चेत राष्ट्रवादीने माघारीच्या निर्णयानंतर पुन्हा निवडणूक लढण्याचा निर्णय घेणे, हे राष्ट्रवादी आघाडीचे अपयश असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी केली. आ. पाटील श्री चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारसभेसाठी आले होते. त्यानंतर आज (दि.९) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. Satej Patil
आ. पाटील म्हणाले की, कारखाना आर्थिक अडचणीत असताना निवडणूक लादणे योग्य नाही. यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आपण व आमदार विनय कोरे बिनविरोधासाठी प्रयत्न करत होतो. कारखाना वाचावा, हा आपला हेतू होता. राष्ट्रवादीने निवडणूक लावली, हा त्यांचा निर्णय आहे. एकदा निवडणूक लागल्यानंतर आपण माघार घेऊ शकत नाही. परंतु, मंत्री मुश्रीफ यांनी कारखान्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मुश्रीफ आणि आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. बिद्रीत आम्ही एकत्र आहोत. आजरा कारखान्यात केवळ दहा दिवस आम्ही वेगळे आहोत. Satej Patil
दरम्यान, कारखान्याला केंद्र शासनाच्या निधीसाठी प्रयत्न करणार आहोत. मात्र, याला कर्ज फेडताना संचालक मंडळ जबाबदार राहणार आहे. दीर्घ मुदतीच्या निधीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. गाळप वाढविल्याशिवाय कारखान्याला स्थैर्य येणार नाही. इथेनॉलला तात्पुरती बंदी आहे. त्यासाठी सर्वपक्षीय मागणी करणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी अध्यक्ष अशोक चराटी, जयवंतराव शिंपी, गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, सुनिल शिंत्रे, उमेश आपटू, डॉ.अनिल देशपांडे, सुनिता रेडेकर, विलास नाईक, अभिषेक शिंपी, विजयकुमार पाटील, विजय देसाई आदी उपस्थित होते.
हेही वाचा 

कोल्हापूर : अब्दुल लाट येथे ‘स्वाभिमानी’ च्या वतीने इथेनॉल निर्मिती बंदीच्या अध्यादेशाची होळी
A. Y. Patil : बिद्री निवडणुकीत घेतलेल्या वेगळ्या भूमिकेबाबत ‘ए. वाय’ यांचा मोठा खुलासा
कोल्हापूर : 13 कारखान्यांचे 200 कोटींचे उत्पन्न घटणार

The post माघारीच्या निर्णयानंतर आजरा कारखान्याची निवडणूक लढवणे राष्ट्रवादीचे अपयश : सतेज पाटील appeared first on पुढारी.

आजरा: पुढारी वृत्तसेवा : आजरा कारखाना बिनविरोधच्या चर्चेत राष्ट्रवादीने माघारीच्या निर्णयानंतर पुन्हा निवडणूक लढण्याचा निर्णय घेणे, हे राष्ट्रवादी आघाडीचे अपयश असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी केली. आ. पाटील श्री चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारसभेसाठी आले होते. त्यानंतर आज (दि.९) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. Satej Patil आ. पाटील म्हणाले की, …

The post माघारीच्या निर्णयानंतर आजरा कारखान्याची निवडणूक लढवणे राष्ट्रवादीचे अपयश : सतेज पाटील appeared first on पुढारी.

Go to Source