धुळे : इंदवे येथील स्मशानभूमीची दुरुस्ती करण्याची मागणी
पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील इंदवे येथील स्मशानभूमीच्या मागील बाजूस असलेली संरक्षण भिंत आणि प्रवेशद्वाराची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
नदीच्या पुरामुळे संरक्षण भिंत आणि प्रवेशद्वाराची कमानीचे नुकसान झाले आहे. यामुळे मोकाट श्वान स्मशानभूमीत प्रवेश करतात. त्यांचा येथे उपद्रव सुरू आहे. अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहांच्या अस्थी व राखेची विटंबना होत आहे. या स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाल्यावर त्याचे पावित्र्य राखणार कोण, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आहे.
या ठिकाणी मृतदेह जाळल्यानंतर त्यांची राख जमा करण्यासाठी आलेल्या नातलगांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागतो. मृतदेहाच्या राखेवर ते ठाण मांडून बसलेले असतात. अस्थी इकडे-तिकडे पसरविलेल्या असतात. यामुळे तातडीने संरक्षण भितीची दुरुस्ती करावी. कमानीला दरवाजे बसवावेत, एलईडी लाईट लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हेही वाचा :
साक्री तालुका मराठी पत्रकार संघाला वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार
अखेर दुर्गम पासली आरोग्य केंद्रात डॉक्टर रुजू
Pimpri News : रस्त्याच्या कामामुळे नागरिक हैराण
The post धुळे : इंदवे येथील स्मशानभूमीची दुरुस्ती करण्याची मागणी appeared first on पुढारी.
पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील इंदवे येथील स्मशानभूमीच्या मागील बाजूस असलेली संरक्षण भिंत आणि प्रवेशद्वाराची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. नदीच्या पुरामुळे संरक्षण भिंत आणि प्रवेशद्वाराची कमानीचे नुकसान झाले आहे. यामुळे मोकाट श्वान स्मशानभूमीत प्रवेश करतात. त्यांचा येथे उपद्रव सुरू आहे. अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहांच्या अस्थी व राखेची विटंबना होत आहे. या स्मशानभूमीत मृतदेहांवर …
The post धुळे : इंदवे येथील स्मशानभूमीची दुरुस्ती करण्याची मागणी appeared first on पुढारी.