‘अशोक भाऊ, यंदा डांबावरच गडी टिपू या’; सांगलीच्या खो-खो निवड चाचणी स्पर्धेत सुरेश पाटील यांची राजकीय टोलेबाजी

विटा; पुढारी वृत्तसेवा : “अशोकभाऊ, यंदा डांबावरच गडी टिपू या!” अशा शब्दांत राष्ट्रीय काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश पाटील यांनी मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक आणि काँग्रेसचे नेते अशोक गायकवाड यांना साद घातली. विट्यात विटा हायस्कूलच्या क्रीडांगणावर जिल्हास्तरीय खो-खो निवड चाचणी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचे उदघाटन काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी … The post ‘अशोक भाऊ, यंदा डांबावरच गडी टिपू या’; सांगलीच्या खो-खो निवड चाचणी स्पर्धेत सुरेश पाटील यांची राजकीय टोलेबाजी appeared first on पुढारी.
#image_title
‘अशोक भाऊ, यंदा डांबावरच गडी टिपू या’; सांगलीच्या खो-खो निवड चाचणी स्पर्धेत सुरेश पाटील यांची राजकीय टोलेबाजी


विटा; पुढारी वृत्तसेवा : “अशोकभाऊ, यंदा डांबावरच गडी टिपू या!” अशा शब्दांत राष्ट्रीय काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश पाटील यांनी मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक आणि काँग्रेसचे नेते अशोक गायकवाड यांना साद घातली.
विट्यात विटा हायस्कूलच्या क्रीडांगणावर जिल्हास्तरीय खो-खो निवड चाचणी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचे उदघाटन काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे सगळे गट एकत्र आले होते. यावेळी आमदार अनिल बाबर गटाशी सख्य असलेले काँग्रेसचे सुरेश पाटील आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील गटाबरोबर पाली का सत्तेतील वाटेकरी काँग्रेसचे अशोक गायकवाड एकत्र व्यासपीठावर होते. आगामी काळातील राजकीय समीकरणावर खो-खोच्या भाषेत भाष्य केले. सुरेश पाटील म्हणाले अशोक गायकवाड हे खरे तर उत्तम व्यावसायिक आणि राष्ट्रीय होते. परंतु आम्हीच त्यांना राजकारणात आणले आणि त्यांना राजकीय खो देण्याचे पाप देखील आम्हीच केले. परंतु आता जितेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजकीयदृष्ट्या एकाच संघात खेळणार असल्याचे सांगत, यापुढे अशोक गायकवाड यांनी त्या संघाचे नेतृत्व करावे. आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य करू. पण त्यांनी आता खो-खो मध्ये जसे डांबावर गडी टिपतात, तसे राजकारणातही विरोधी असणारा गडी डांबावर टिपावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर अशोक गायकवाड यांनी सुरेश पाटील यांना सकारात्मक हसून दाद दिली. तर जितेश कदम यांनी हाच धागा पकडत हे राजकीय बोलायचे व्यासपीठ नसले तरी योग्य वेळी, योग्य निर्णय घेऊ असे सूचक वक्तव्य केले. विटा शहर हे खो-खो खेळामध्ये देशपातळीवर चमकलेले गाव आहे. त्यामुळे येथे राष्ट्रीय स्पर्धा घ्या आम्ही सर्वतोपरी मदत करू. तसेच या गावात ज्या नावापुढे अॕडवोकेट अशी पदवी लागते त्या व्यक्तीला काहीतरी चांगले मिळतेच, अशी मल्लिनाथीही जितेश कदम यांनी केली.
अशोक गायकवाड म्हणाले, खेळाडू तयार व्हायचे असतील तर उद्योगपतींनी सढळ हाताने मदत केली पाहिजे. पूर्वीच्या काळी खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जात होत्या. समाजातील अशा लोकांनी आता मदत केली तर भविष्यात चांगले खेळाडू निर्माण होतील असेही गायकवाड यांनी नमूद केले. यावेळी सुमित गायकवाड यांनी खो खो संघटनेने विट्याला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी केली.
या कार्यक्रमाला आमदार बाबर प्रेमी कृष्णात गायकवाड आणि नंदकुमार पाटील हेही उपस्थित होते. हा कार्यक्रम माजी आमदार सदाशिव पाटील गटाचे माजी नगरसे वक सुमीत गायकवाड यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. यावेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि बंडोपंत राजोपाध्ये यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
The post ‘अशोक भाऊ, यंदा डांबावरच गडी टिपू या’; सांगलीच्या खो-खो निवड चाचणी स्पर्धेत सुरेश पाटील यांची राजकीय टोलेबाजी appeared first on पुढारी.

विटा; पुढारी वृत्तसेवा : “अशोकभाऊ, यंदा डांबावरच गडी टिपू या!” अशा शब्दांत राष्ट्रीय काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश पाटील यांनी मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक आणि काँग्रेसचे नेते अशोक गायकवाड यांना साद घातली. विट्यात विटा हायस्कूलच्या क्रीडांगणावर जिल्हास्तरीय खो-खो निवड चाचणी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचे उदघाटन काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी …

The post ‘अशोक भाऊ, यंदा डांबावरच गडी टिपू या’; सांगलीच्या खो-खो निवड चाचणी स्पर्धेत सुरेश पाटील यांची राजकीय टोलेबाजी appeared first on पुढारी.

Go to Source