WPL च्या प्रारंभीच्या लिलावात कांगारूंचे वर्चस्व, ‘सदरलँड’ला २ कोटी, तर फोबीला १ कोटीची बोली

पुढारी ऑनलाईन : महिला प्रीमियर लीग २०२४ साठी (WPL auction 2024 ) आज (दि.९) मुंबईत खेळाडूंचा लिलाव होत आहे. सुरुवातीच्या लिलावात ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एनाबेल सदरलँड हिला दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी रुपयांना खरेदी केले. तिची बेस प्राइस ४० लाख रुपये होती. सदरलँडला घेण्यासाठी दिल्ली आणि मुंबई यांच्यात चुरस दिसून आली. अखेर दिल्लीने बाजी मारत तिच्यासाठी … The post WPL च्या प्रारंभीच्या लिलावात कांगारूंचे वर्चस्व, ‘सदरलँड’ला २ कोटी, तर फोबीला १ कोटीची बोली appeared first on पुढारी.
#image_title
WPL च्या प्रारंभीच्या लिलावात कांगारूंचे वर्चस्व, ‘सदरलँड’ला २ कोटी, तर फोबीला १ कोटीची बोली


पुढारी ऑनलाईन : महिला प्रीमियर लीग २०२४ साठी (WPL auction 2024 ) आज (दि.९) मुंबईत खेळाडूंचा लिलाव होत आहे. सुरुवातीच्या लिलावात ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एनाबेल सदरलँड हिला दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी रुपयांना खरेदी केले. तिची बेस प्राइस ४० लाख रुपये होती. सदरलँडला घेण्यासाठी दिल्ली आणि मुंबई यांच्यात चुरस दिसून आली. अखेर दिल्लीने बाजी मारत तिच्यासाठी २ कोटी रुपये मोजले.
ऑस्ट्रेलियाची फलंदाज फोबी लिचफिल्ड हिला गुजरातने १ कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतले. फोबी लिचफील्ड ही २०२४ च्या लिलावात बोली लागलेली पहिली खेळाडू होती. ही ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. तिची बेस प्राइस ३० लाख रुपये होती आणि तिला गुजरात जायंट्सने १ कोटी रुपयांना विकत घेतले.
इंग्लंडची फलंदाज डेनी वायट हिला यूपी वॉरियर्सने बेस प्राइस ३० लाखांमध्ये खरेदी केले.
भारती फुलमली आणि मोना मेशराम यांच्यावर कोणीही बोली लावली नाही. त्याचबरोबर भारताची वेदा कृष्णमूर्ती, पूनम राउत, प्रिया पूनिया देखील अनसोल्ड राहिली. भारताची अस्टपैले देविका वैद्य हिलादेखील कोणी बोली लावली नाही.
ऑस्ट्रेलियन खेळाडू जॉर्जिया वेरहॅमची बेस प्राईस ४० लाख रुपये होती. तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने ४० लाख रुपयांना विकत घेतले. लिलावकर्ता म्हणून मल्लिका सागर काम पाहात आहेत.
आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या महिला प्रीमिअर लीगचा हा दुसरा हंगाम आहे. त्यासाठी आज (दि. ९ डिसेंबर) मुंबईत महिला प्रीमिअर लीग २०२४ (WPL auction 2024 ) साठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. एकूण १६५ खेळाडूंनी डब्ल्यूपीएल २०२४ च्या लिलावासाठी नोंदणी केली आहे. यात १०४ भारतीय आणि ६१ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. १६५ क्रिकेटपटूंपैकी १५ खेळाडू सहयोगी देशांचे आहेत, तर कॅप्ड खेळाडूंची एकूण संख्या ५६ आणि अनकॅप्ड खेळाडू १०९ आहेत. पाच संघांकडे जास्तीत जास्त ३० स्लॉट उपलब्ध आहेत, त्यापैकी ९ जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत. (WPL 2024 Auction)
The post WPL च्या प्रारंभीच्या लिलावात कांगारूंचे वर्चस्व, ‘सदरलँड’ला २ कोटी, तर फोबीला १ कोटीची बोली appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : महिला प्रीमियर लीग २०२४ साठी (WPL auction 2024 ) आज (दि.९) मुंबईत खेळाडूंचा लिलाव होत आहे. सुरुवातीच्या लिलावात ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एनाबेल सदरलँड हिला दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी रुपयांना खरेदी केले. तिची बेस प्राइस ४० लाख रुपये होती. सदरलँडला घेण्यासाठी दिल्ली आणि मुंबई यांच्यात चुरस दिसून आली. अखेर दिल्लीने बाजी मारत तिच्यासाठी …

The post WPL च्या प्रारंभीच्या लिलावात कांगारूंचे वर्चस्व, ‘सदरलँड’ला २ कोटी, तर फोबीला १ कोटीची बोली appeared first on पुढारी.

Go to Source