टेम्पोचालकाच्या मुलीची राज्य महिला कर्णधारपदाला गवसणी

कुरुंदवाड; जमीर पठाण : कुरुंदवाड येथील अरविंद काशिनाथ गायकवाड या टेम्पो चालकाची मुलगी आदिती गायकवाडने महाराष्ट्र राज्य महिला संघाच्या कर्णधारपदाला गवसणी घातली आहे. बीसीसीआयमार्फत घेण्यात येणाऱ्या २३ वर्षाखालील महिला टी २० स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून आदितीची निवड करण्यात आली आहे. १० ते ३१ डिसेंबर दरम्यान त्रिवेंद्रम (केरळ) येथे होणाऱ्या टी- २० … The post टेम्पोचालकाच्या मुलीची राज्य महिला कर्णधारपदाला गवसणी appeared first on पुढारी.
#image_title

टेम्पोचालकाच्या मुलीची राज्य महिला कर्णधारपदाला गवसणी

कुरुंदवाड; जमीर पठाण : कुरुंदवाड येथील अरविंद काशिनाथ गायकवाड या टेम्पो चालकाची मुलगी आदिती गायकवाडने महाराष्ट्र राज्य महिला संघाच्या कर्णधारपदाला गवसणी घातली आहे. बीसीसीआयमार्फत घेण्यात येणाऱ्या २३ वर्षाखालील महिला टी २० स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून आदितीची निवड करण्यात आली आहे. १० ते ३१ डिसेंबर दरम्यान त्रिवेंद्रम (केरळ) येथे होणाऱ्या टी- २० साखळी पध्दतीच्या या स्पर्धेत महाराष्ट्राचे ती नेतृत्व करणार आहे.
येथील आदिती गायकवाडचे वडील कुरुंदवाड येथील माल वाहतूक टेम्पोवर चालक म्हणून काम करतात. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. आपल्या घरच्या परिस्थिची जाणीव ठेवून अदितीने क्रिकेटमध्ये आपले नशीब घडवण्याच्या दृष्टीने आजोबा काशिनाथ गायकवाड यांच्याजवळ हट्ट धरला. वडिलांनी मुलीने खेळापेक्षा शिक्षणावर भर देऊन घरकामात मदत करावी असे सांगत होते. मात्र आजोबा काशिनाथ हे आदीतीच्या पाठीशी राहीले. तिच्यासोबत स्पर्धेला जाऊन तिला प्रोत्साहन देऊन घडवण्यामध्ये काशिनाथ यांचा सिहाचा वाटा आहे.
अदितीने क्रिकेटमध्ये प्राविण्य मिळवत फलंदाजीसह फिरकी गोलंदाज म्हणून अष्टपैलू खेळाडूचे प्राविण्य मिळवले आहे. यापूर्वी महाराष्ट्रात १९ वर्षाखालील संघात सलग पाच वर्षे तिने आपल्या खेळाची चमक दाखवली आहे. २०१५-१६ मध्ये बीसीसीआयच्या पश्चिम विभागीय १९ वर्षाखालील संघात देखील तिची निवड झाली होती. बीसीसीआयतर्फे २३ वर्षाखालील महिला टी-२० स्पर्धेसाठी २०१८-२० २० मध्ये निवड झाली होती. आदिती गेली तीन वर्षे महाराष्ट्र महिला वरिष्ठ संघातून खेळत आहे. ती आता कर्णधार म्हणून महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.
घरची परिस्थिती गरिबीची असताना मला क्रिकेटमध्ये करियर घडवायचे होते. मी घेत असलेल्या मेहनतीला आजोबा आणि वडिलांच्या परिश्रमाची किनार लाभली. म्हणूनच आज माझ्या प्रयत्नाला झालर मिळाली आहे. वडिलांनी माझ्या यशासाठी रात्री उशिरापर्यंत कष्ट केले. तर आजोबांनीही माझे काही साहित्य खरेदीसाठी शेतमजुरी करून मला उपलब्ध करून दिले. या यशाचे सर्व श्रेय मी त्यांना देते.
– अदिती गायकवाड
हेही वाचा : 

गंभीर मैदानावर म्‍हणाला, ‘तू फिक्सर आहेस’; श्रीसंतचा व्‍हिडिओ व्‍हायरल
विराट काेहलीबाबत ब्रायर लाराचे मोठे विधान, “सचिनचा रेकॉर्ड तोडणे…”
जोपर्यंत चालू शकतो तोपर्यंत आयपीएल खेळणार : ग्लेन मॅक्सवेल

The post टेम्पोचालकाच्या मुलीची राज्य महिला कर्णधारपदाला गवसणी appeared first on पुढारी.

कुरुंदवाड; जमीर पठाण : कुरुंदवाड येथील अरविंद काशिनाथ गायकवाड या टेम्पो चालकाची मुलगी आदिती गायकवाडने महाराष्ट्र राज्य महिला संघाच्या कर्णधारपदाला गवसणी घातली आहे. बीसीसीआयमार्फत घेण्यात येणाऱ्या २३ वर्षाखालील महिला टी २० स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून आदितीची निवड करण्यात आली आहे. १० ते ३१ डिसेंबर दरम्यान त्रिवेंद्रम (केरळ) येथे होणाऱ्या टी- २० …

The post टेम्पोचालकाच्या मुलीची राज्य महिला कर्णधारपदाला गवसणी appeared first on पुढारी.

Go to Source