मोशी : गुलाबी थंडीत आरोग्यवर्धक फळांची मागणी वाढली

मोशी : दिवाळीनंतर थंडी जास्त जाणवत आहे. परिणामी, त्याचा प्रादुर्भाव फळांवर झाला आहे. डिसेंबर महिन्यात दाट धुके व बदलत्या वातावरणामुळे फळांचे दर दहा टक्क्यांनी घसरले आहेत. तरीही आरोग्यवर्धक फळांना मागणी असल्याची माहिती मोशी कृषी उत्पन्न उपबाजार समितीमधील फळ विक्रेत्या व्यापार्‍यांनी दिली. अफगाण, तुर्की, इटली, इराण या देशांमधून सफरचंद आयात होत आहेत. तर, किवी हे फळ … The post मोशी : गुलाबी थंडीत आरोग्यवर्धक फळांची मागणी वाढली appeared first on पुढारी.
#image_title

मोशी : गुलाबी थंडीत आरोग्यवर्धक फळांची मागणी वाढली

मोशी : दिवाळीनंतर थंडी जास्त जाणवत आहे. परिणामी, त्याचा प्रादुर्भाव फळांवर झाला आहे. डिसेंबर महिन्यात दाट धुके व बदलत्या वातावरणामुळे फळांचे दर दहा टक्क्यांनी घसरले आहेत. तरीही आरोग्यवर्धक फळांना मागणी असल्याची माहिती मोशी कृषी उत्पन्न उपबाजार समितीमधील फळ विक्रेत्या व्यापार्‍यांनी दिली.
अफगाण, तुर्की, इटली, इराण या देशांमधून सफरचंद आयात होत आहेत. तर, किवी हे फळ अमेरिका या देशांमधून आयात होत आहे. त्यामुळे फळांचा दर्जा हा उत्कृष्ट आहे. तसेच, मोशीमधून फळे निर्यातदेखील होत आहेत. राज्यात ठिकठिकाणी फळांचा पुरवठा केला जात आहे.
हिवाळ्यात फळामुळे शरीराला ऊर्जा
थंडीच्या काळात बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळे मुबलक प्रमाणात आणि कमी किमतीत उपलब्ध असतात. थंडीच्या काळात शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. तसेच, वर्षभर तब्येत ठणठणीत राहावी यासाठी या काळात आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते. प्रतिकारशक्ती चांगली राहावी यादृष्टीने या काळात व्यायाम करणे,आहारात जास्तीत जास्त पौष्टीक पदार्थांचा समावेश करणे या गोष्टी आवर्जून केल्या जातात. स्ट्रॉबेरी, संत्री, सीताफळ, डाळींब, सफरचंद, आवळा ही फळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शरीराला आवश्यक आहेत.
ढगाळ वातावरणामुळे संत्रीचे दर घसरले आहेत. पपई मागील आठवड्यात 35 ते 40 रुपये व पेरू 40 ते 42 व डाळिंब 200 रुपये किलोप्रमाणे होते. या आठवड्यात दर उतरले आहेत. मात्र, गिर्‍हाईकांची गर्दी नेहमीप्रमाणे आहे.
– मारुती बिराजदार, व्यापारी, मोशी उपबाजार समिती

 काश्मिरी सफरचंद – 120 ते 150
 शिमला सफरचंद किन्नोर – 200
स्ट्रॉबेरी- 200 ते 250
 सफरचंद रॉयल गाला – 200
 इराणी सफरचंद – 130 ते 150
रेड डिलिशियस सफरचंद – 140 ते 160
 संत्रा – 150 ते 160
 वेलची केळी – 80 ते 100
 ड्रॅगन – 80 ते 120
मोसंबी – 50 ते 60
 चिकू 30 ते 40
 डाळिंब – 100 ते 150
 गुलाबी पेरू – 30 ते 35
 पांढरा पेरू- 20 ते 30
 पपई – 10 ते 15
कलिंगड – 10 ते 20
 किवी – 800 ते 1250- 54 नग
 केळी – डझनमध्ये – 40 ते 60

हेही वाचा

Pimpri News : प्राधिकरण बनले समस्यांचे माहेरघर !
नांदेड : मराठा आरक्षणाचा विषय अंतिम टप्प्यात : जरांगे पाटील
Maharashtra Politics | उद्धव देवालये बंदिस्त ठेवून मद्यालये उघडत होते, बावनकुळेंची खोचक पोस्ट

The post मोशी : गुलाबी थंडीत आरोग्यवर्धक फळांची मागणी वाढली appeared first on पुढारी.

मोशी : दिवाळीनंतर थंडी जास्त जाणवत आहे. परिणामी, त्याचा प्रादुर्भाव फळांवर झाला आहे. डिसेंबर महिन्यात दाट धुके व बदलत्या वातावरणामुळे फळांचे दर दहा टक्क्यांनी घसरले आहेत. तरीही आरोग्यवर्धक फळांना मागणी असल्याची माहिती मोशी कृषी उत्पन्न उपबाजार समितीमधील फळ विक्रेत्या व्यापार्‍यांनी दिली. अफगाण, तुर्की, इटली, इराण या देशांमधून सफरचंद आयात होत आहेत. तर, किवी हे फळ …

The post मोशी : गुलाबी थंडीत आरोग्यवर्धक फळांची मागणी वाढली appeared first on पुढारी.

Go to Source