शिंदवणेत शिक्षकावर प्राणघातक हल्ला

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : उरुळी कांचन – शिंदवणे रस्तावर शिंदवणे (ता. हवेली) हद्दीत एका शिक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मोहन गोरखनाथ आंबेकर (वय 56, रा. आंबेकरवस्ती, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे या शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्यावर हडपसर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. उरुळी कांचन- शिंदवणे रस्त्यावर बुधवारी (दि. 6) सायंकाळी … The post शिंदवणेत शिक्षकावर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.
#image_title

शिंदवणेत शिक्षकावर प्राणघातक हल्ला

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : उरुळी कांचन – शिंदवणे रस्तावर शिंदवणे (ता. हवेली) हद्दीत एका शिक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मोहन गोरखनाथ आंबेकर (वय 56, रा. आंबेकरवस्ती, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे या शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्यावर हडपसर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. उरुळी कांचन- शिंदवणे रस्त्यावर बुधवारी (दि. 6) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
संबंधित बातम्या :

Vegan diet : वेगन आहारामुळे घटते खराब कोलेस्टेरॉल
Chennai Flood : रजनीकांत यांच्या गार्डन हाऊसमध्ये पुराचे पाणी शिरले (Video Viral)
Maharashtra Politics | उद्धव देवालये बंदिस्त ठेवून मद्यालये उघडत होते, बावनकुळेंची खोचक पोस्ट

या प्रकरणी त्यांचे बंधू संभाजी गोरखनाथ आंबेकर (वय 59, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन आंबेकर हे शिंदवणे येथील संत यादवबाबा माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास संभाजी आंबेकर यांना एका नातेवाइकाने, तुमचे बंधू मोहन आंबेकर यांचा अपघात झाला असून, त्यांना उरुळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे फोनवरून सांगितले.
या घटनेची चौकशी करून संभाजी आंबेकर हे तत्काळ रुग्णालयात पोहोचले. या वेळी मोहन आंबेकर हे बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी हडपसर येथे हलविण्यात आले.
दरम्यान, संभाजी आंबेकर यांनी अपघात झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, त्या ठिकाणी त्यांची दुचाकी सुस्थितीत दिसून आली. पुढे जाऊन पाहिले असता एक लाकडी दांडके मिळाले. त्याच्या शेजारीच रक्ताचे डाग दिसले. यावरून अपघात झाला नसून, कोणीतरी मारहाण केल्याची त्यांची खात्री झाली. त्यानुसार त्यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
The post शिंदवणेत शिक्षकावर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : उरुळी कांचन – शिंदवणे रस्तावर शिंदवणे (ता. हवेली) हद्दीत एका शिक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मोहन गोरखनाथ आंबेकर (वय 56, रा. आंबेकरवस्ती, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे या शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्यावर हडपसर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. उरुळी कांचन- शिंदवणे रस्त्यावर बुधवारी (दि. 6) सायंकाळी …

The post शिंदवणेत शिक्षकावर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.

Go to Source