खैर लाकडाच्या तस्करीचा पर्दाफाश, ट्रकसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपळनेर (ता.साक्री): नागपूर-सूरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारीकडून साक्रीकडे लाकुड घेऊन ट्रक जात होता. या ट्रकला कोंडाईबारी वनविभागाच्या पथकाने 5 ते 6 किमी पाठलाग करत पकडले. या कारवाईत ट्रकसह 10 लाख 87 हजार 148 रुपये किंमतीचे लाकुड जप्त करण्यात आले. वनविभागाने अलिकडच्या काळात केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. कोंडाईबारी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सविता दिलीप … The post खैर लाकडाच्या तस्करीचा पर्दाफाश, ट्रकसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.
#image_title

खैर लाकडाच्या तस्करीचा पर्दाफाश, ट्रकसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपळनेर (ता.साक्री): नागपूर-सूरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारीकडून साक्रीकडे लाकुड घेऊन ट्रक जात होता. या ट्रकला कोंडाईबारी वनविभागाच्या पथकाने 5 ते 6 किमी पाठलाग करत पकडले. या कारवाईत ट्रकसह 10 लाख 87 हजार 148 रुपये किंमतीचे लाकुड जप्त करण्यात आले. वनविभागाने अलिकडच्या काळात केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे.
कोंडाईबारी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सविता दिलीप सोनवणे आणि वन कर्मचाऱ्यांसह गुरुवारी मध्य रात्री गस्त घालत होते. त्यांना ट्रकमधून (एम.एच.14,ए.एच. 6516) लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याचा संशय आला. वन विभागाच्या पथकाने ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु ट्रक थांबला नाही. यामुळे पथकाने 5 ते 6 किमीपर्यंत ट्रकचा पाठलाग करत पकडला. ट्रक चालक आणि सहचालक मात्र फरार होण्यात यशस्वी झाले. ट्रकच्या मागील बाजूस तांदळाचा (भुसा) भरलेल्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या. त्या गोण्यांच्या आत खैर जातीचे लाकुड ट्रकमध्ये भरलेले आढळून आले. ट्रक आणि खैर प्रजातीचे लाकूडासह मुद्देमाल ताब्यात घेतला.
लाकडाची किंमत 2 लाख 87 हजार 148 रुपये आहे. तर वाहनाची किंमत अंदाजे 8 लाख रुपये आहे. असा एकूण 10 लाख 87 हजार 148 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक नितिनकुमार सिंग, दक्षता पथकाचे विभागीय वनाधिकारी आर.आर. सदगीर, सहायक वनसंरक्षक डी.आर. अडकिणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडाईबारी वनपरिक्षेत्र अधिकारी सविता सोनवणे आणि वनकर्मचाऱ्यांनी केली. यासंदर्भात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. वनविभागाच्या या कारवाईमुळे अवैध लाकूड तस्करीला आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा :

खासदार श्रीरंग बारणे यांना लोकसभेच्या पीठासीन अधिकारी पदाचा बहुमान
NAMCO Bank Election : तडजोडीच्या रणनितीतून दबावतंत्राची चाल, हालचालींना वेग
Pune News : झोपडपट्टी पुनर्वसनाच्याही आता होणार टोलेजंग इमारती

The post खैर लाकडाच्या तस्करीचा पर्दाफाश, ट्रकसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

पिंपळनेर (ता.साक्री): नागपूर-सूरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारीकडून साक्रीकडे लाकुड घेऊन ट्रक जात होता. या ट्रकला कोंडाईबारी वनविभागाच्या पथकाने 5 ते 6 किमी पाठलाग करत पकडले. या कारवाईत ट्रकसह 10 लाख 87 हजार 148 रुपये किंमतीचे लाकुड जप्त करण्यात आले. वनविभागाने अलिकडच्या काळात केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. कोंडाईबारी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सविता दिलीप …

The post खैर लाकडाच्या तस्करीचा पर्दाफाश, ट्रकसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Go to Source