तेलंगणा : नवनिर्वाचित आमदारांनी अकबरुद्दीन ओवेसींसमोर घेतली शपथ; भाजप आमदारांचा बहिष्कार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल नेते अकबरुद्दीन ओवेसी यांना तेलंगणाच्या नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमध्ये प्रोटेम स्पीकर बनवण्यात आले आहे. नवनिर्वाचित नेत्यांनी प्रो-टर्म स्पीकर अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासमोर तेलंगणा विधानसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. मात्र यावेळी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांना मंत्र्यांच्या खात्यांची यादी देखील सादर केली आहे.
तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांच्या नियुक्तीनंतर AIMIM आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी विधानसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ घेतली. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी ओवेसींसमोर शपथ घेणार नसून शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले होते. आज नवनिर्वाचित आमदारांना ओवेसी यांनी तेलंगणा विधानसभेचे सदस्य म्हणून शपथ दिली असतानाच भाजपच्या आमदारांनी मात्र बहिष्कार टाकला.
नव्या विधानसभेचे पहिले अधिवेशन आज पासून सुरू होत आहे. प्रो टेम स्पीकर तात्पुरती भूमिका बजावतो आणि नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईपर्यंत आणि स्पीकरची निवड होईपर्यंत विधानसभेचे अधिवेशन चालवतो. ओवेसी यांना प्रोटेम स्पीकर बनवल्याबद्दल भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली.
The post तेलंगणा : नवनिर्वाचित आमदारांनी अकबरुद्दीन ओवेसींसमोर घेतली शपथ; भाजप आमदारांचा बहिष्कार appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल नेते अकबरुद्दीन ओवेसी यांना तेलंगणाच्या नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमध्ये प्रोटेम स्पीकर बनवण्यात आले आहे. नवनिर्वाचित नेत्यांनी प्रो-टर्म स्पीकर अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासमोर तेलंगणा विधानसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. मात्र यावेळी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांना मंत्र्यांच्या खात्यांची …
The post तेलंगणा : नवनिर्वाचित आमदारांनी अकबरुद्दीन ओवेसींसमोर घेतली शपथ; भाजप आमदारांचा बहिष्कार appeared first on पुढारी.
