अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई द्या; खा. प्रफुल्ल पटेल यांची मागणी
गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : नागपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्यात यावा. शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून 25000 रु हेक्टरी मदत जाहीर करण्याबाबदचे निवेदन देऊन खा. प्रफुल पटेल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी आज 8 डिसेंबर रोजी सकारात्मक चर्चा केली.
मागील काही दिवसापासून अवकाळी पावसामुळे पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांचे धानपिक, धानाच्या कडपा तसेच शेतात असलेले पुजन्यांना अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतात असलेल्या कडधान्याच्या पीकाचे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण आणि पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानीचा मोबदला देण्यात यावा. तसेच मागच्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांचा यावर्षी लागणारा मशागतीचा वाढीव खर्च लक्षात घेता डीबीटीच्या माध्यमातून बोनस स्वरूपात 25000 रु हेक्टरी मदत जाहीर करण्यात यावी. यासंबंधी खा. पटेल यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राजू कारेमोरे, विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, सुनील फुंडे उपस्थित होते.
हेही वाचलंत का?
Stock Market Closing Bell | निफ्टी २१ हजारांवर, सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढून बंद, नेमकं काय घडलं?
Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी प्रकरण भोवले: तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी
The post अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई द्या; खा. प्रफुल्ल पटेल यांची मागणी appeared first on पुढारी.
गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : नागपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्यात यावा. शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून 25000 रु हेक्टरी मदत जाहीर करण्याबाबदचे निवेदन देऊन खा. प्रफुल पटेल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी आज 8 डिसेंबर रोजी सकारात्मक चर्चा केली. मागील काही दिवसापासून अवकाळी पावसामुळे पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांचे धानपिक, धानाच्या कडपा …
The post अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई द्या; खा. प्रफुल्ल पटेल यांची मागणी appeared first on पुढारी.