नाशिक : कांदा निर्यात बंदीविरोधात मनमाड- नगर महामार्ग रोखला

येवला : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी जाहीर केल्याने कांदा बाजारभाव गडगडले आहेत. याच्या निषेधार्थ येवला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मनमाड – नगर महामार्गावर शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रास्ता रोको केला. शेतकऱ्यांनी ठिय्या देत आंदोलन केल्याने वाहतूक खोळंबली होती. यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निर्यातबंदीमुळे चार … The post नाशिक : कांदा निर्यात बंदीविरोधात मनमाड- नगर महामार्ग रोखला appeared first on पुढारी.
#image_title

नाशिक : कांदा निर्यात बंदीविरोधात मनमाड- नगर महामार्ग रोखला

येवला : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी जाहीर केल्याने कांदा बाजारभाव गडगडले आहेत. याच्या निषेधार्थ येवला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मनमाड – नगर महामार्गावर शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रास्ता रोको केला. शेतकऱ्यांनी ठिय्या देत आंदोलन केल्याने वाहतूक खोळंबली होती. यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निर्यातबंदीमुळे चार हजारांना विक्री होणारा कांदा अचानक २ हजार पेक्षाही खाली आला. त्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला.
केंद्र सरकारने कांद्यावर अचानकपणे शुक्रवारी (दि. ८) निर्यात बंदी लादल्याने कांद्याचे भाव पडले आहे. आधीच अवकाळी व गारपिटीमुळे लाल कांद्याचे नुकसान झाले आहे, त्यातच शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही. त्या कांद्यात थोडाफार भाव मिळत असल्याने केंद्र सरकारने नागरी शहरातील लोकांचा विचार करत तातडीने निर्यात बंदी लादली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा 

Mahaprabodhana Yatra : नाशिकमध्ये धडाडणार सुषमा अंधारेंची तोफ, 10 पासून महाप्रबोधन यात्रा
Nashik News : 59 प्रकरणांत नाशिककर साडेसहा कोटींना गंडले
Priyank Kharge Statement : नाशिकमध्ये खर्गेपुत्राची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

The post नाशिक : कांदा निर्यात बंदीविरोधात मनमाड- नगर महामार्ग रोखला appeared first on पुढारी.

येवला : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी जाहीर केल्याने कांदा बाजारभाव गडगडले आहेत. याच्या निषेधार्थ येवला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मनमाड – नगर महामार्गावर शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रास्ता रोको केला. शेतकऱ्यांनी ठिय्या देत आंदोलन केल्याने वाहतूक खोळंबली होती. यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निर्यातबंदीमुळे चार …

The post नाशिक : कांदा निर्यात बंदीविरोधात मनमाड- नगर महामार्ग रोखला appeared first on पुढारी.

Go to Source