तृणमूल खासदार महुआ मोइत्रांच्या हकालपट्टीनंतर विरोधक नाराज

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा सभेतील कॅश फॉर क्वेरी प्रकरण तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांना भोवले आहे. या प्रकरणात दोषी ठरवत मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. नैतिक आचरण समितीने अहवालानुसार, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आज (दि.८) घोषणा केली. यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातून काढता पाय घेतला.  संसद सभागृह परिसरात माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षाच्या … The post तृणमूल खासदार महुआ मोइत्रांच्या हकालपट्टीनंतर विरोधक नाराज appeared first on पुढारी.
#image_title

तृणमूल खासदार महुआ मोइत्रांच्या हकालपट्टीनंतर विरोधक नाराज

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा सभेतील कॅश फॉर क्वेरी प्रकरण तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांना भोवले आहे. या प्रकरणात दोषी ठरवत मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. नैतिक आचरण समितीने अहवालानुसार, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आज (दि.८) घोषणा केली. यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातून काढता पाय घेतला.  संसद सभागृह परिसरात माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या कारवाईचा निषेध करत, तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या निर्णयावर भाजपवर देखील विरोधी पक्षाच्या खासदारांनी हल्लाबोल केला. (Mahua Moitra TMC)
लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा आज (दि. ८) केली.  मोईत्रा यांचे खासदार म्हणून वर्तन अनैतिक आणि अशोभनीय असल्याचा समितीचा निष्कर्ष हे सभागृह मान्य करत आहे. त्यामुळे त्यांचे खासदार म्हणून राहणे योग्य नाही, अशी टिप्पणी बिर्ला यांनी केली.
पुढे महुआ मोइत्रांनी केलेल्या गंभीर गैरवर्तनाबद्दल कठोर शिक्षेची गरज आहे. त्यामुळे समितीने शिफारस केली आहे की खासदार महुआ मोईत्रा यांची सतराव्या लोकसभेच्या सदस्यत्वावरून हकालपट्टी केली जाऊ शकते. महुआ यांच्या अत्यंत आक्षेपार्ह, अनैतिक, गंभीर आणि गुन्हेगारी वर्तनाच्या पार्श्वभूमीवर समितीने केंद्र सरकारला कालबद्ध पद्धतीने सखोल, कायदेशीर, संस्थात्मक चौकशी करण्याची शिफारसही केली आहे.

Opposition stages walkout after Lok Sabha adopts motion to expel Mahua Moitra as TMC MP pic.twitter.com/3HJggrlDWy
— ANI (@ANI) December 8, 2023

#WATCH | Opposition MPs in Parliament premises after they stage walkout following Lok Sabha adopting motion to expel Mahua Moitra as TMC MP pic.twitter.com/5RJ9kaFWPN
— ANI (@ANI) December 8, 2023

हेही वाचा:

Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी प्रकरण भोवले: तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी
Mahua Moitra: ‘महुआने माझा कुत्रा चोरला’ : मोइत्रांच्या एक्स जोडीदाराच्या आरोपानंतर ट्विटरवर नुसता राडाच राडा, कुत्राही आला ट्रेंडमध्ये
Mamata Banerjee: महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेतून हकालपट्टीचे ‘कारस्थान’, पण…; ममता बॅनर्जींचे स्पष्टीकरण

The post तृणमूल खासदार महुआ मोइत्रांच्या हकालपट्टीनंतर विरोधक नाराज appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा सभेतील कॅश फॉर क्वेरी प्रकरण तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांना भोवले आहे. या प्रकरणात दोषी ठरवत मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. नैतिक आचरण समितीने अहवालानुसार, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आज (दि.८) घोषणा केली. यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातून काढता पाय घेतला.  संसद सभागृह परिसरात माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षाच्या …

The post तृणमूल खासदार महुआ मोइत्रांच्या हकालपट्टीनंतर विरोधक नाराज appeared first on पुढारी.

Go to Source