नाशिकमध्ये साडेतीनशेहून अधिक मांस विक्रेते अनधिकृत
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महापालिका क्षेत्रात मांस, मासळी विक्रीसाठी अधिकृत परवाना असणे बंधनकारक असताना जेमतेम २५० विक्रेत्यांनीच पालिकेकडून व्यवसायासाठी अधिकृत परवाना घेतला आहे. अद्यापही साडेतीनशे विक्रेते विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात ३७ अनधिकृत व्यावसायिकांना महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. परवाना नसलेल्या विक्रेत्यांना यापुढे पालिका हद्दीत व्यवसाय करता येणार नसल्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे.
शासनाच्या निर्देशांनुसार महापालिका हद्दीत मांस, मासळी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांसाठी महापालिकेने उपविधी तयार केली आहे. या उपविधीनुसार महापालिका हद्दीत मांस, मासळी विक्री करण्यासाठी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून विहित शुल्क भरून अधिकृत परवाना घेणे बंधनकारक आहे. मांस, मासळी विक्रीसाठी या उपविधीने काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार मांस, मासळी विक्रीची जागा स्वच्छ, बंदीस्त असणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही शहरात अनेक ठिकाणी मांस, मासळी विक्रीची दुकाने उघड्यावर आहेत. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होऊन परिसरातील नागरिकांना रोगराईच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे परवाना घेण्यासाठी मांस, मासळी विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांकडून मांस विक्रेत्यांच्या दुकानांनाही प्रत्यक्ष भेटी दिल्या गेल्या. त्यानंतर ३५० मांस विक्रेत्यांनी परवान्यांसाठी महापालिकेकडे अर्ज केले. त्यातील सुमारे २५० विक्रेत्यांना तरतुदींनुसार परवाना देण्यात आला. अद्यापही शहरात साडेतीनशेहून अधिक मांस विक्रेते विनापरवाना व्यवसाय करीत असल्याची पशुसंवर्धन विभागाची माहिती आहे. त्यामुळे या अनधिकृत मांस विक्रेत्यांविरोधात कारवाईची मोहीम उघडण्यात आली आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने पथक नियुक्त केले असून, या पथकामार्फत शहरातील मांस विक्रेत्यांच्या दुकानांना भेटी दिल्या जात आहेत.
परवाना नूतनीकरणाचे आवाहन
मांस, मासे विक्रेत्यांसाठी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून एक वर्षाचा परवाना दिला जातो. दरवर्षी जानेवारीत या परवान्याचे नूतनीकरण करणे गरजेचे असते. त्यामुळे परवानाधारक मांस विक्रेत्यांनी परवान्याचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी केले आहे.
मांस विक्रेत्यांसाठी महापालिकेचा परवाना अनिवार्य असून, परवाना न घेता व्यवसाय केल्यास ५०० रुपयांचा दंड केला जातो. यापुढे अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. ज्या विक्रेत्यांकडे परवाना नाही, त्यांनी सत्वर परवाना घ्यावा तसेच परवाना असलेल्या विक्रेत्यांनी नूतनीकरण करून घ्यावे.
– डॉ. प्रमोद सोनवणे, पशुसंवर्धन अधिकारी, महापालिका
——-०——–
हेही वाचा :
Bidri Sakhar Karkhana | बिद्री कारखाना पदाधिकारी निवड १५ डिसेंबरला
Mahua Moitra | महुआ मोईत्रा यांची खासदारकी धोक्यात, लोकसभेतून हकालपट्टीची समितीची शिफारस
पिंपरी : ‘एक दिवस शाळेसाठी’ पोलीस आयुक्तालयाच्या वतीने उपक्रम
The post नाशिकमध्ये साडेतीनशेहून अधिक मांस विक्रेते अनधिकृत appeared first on पुढारी.
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महापालिका क्षेत्रात मांस, मासळी विक्रीसाठी अधिकृत परवाना असणे बंधनकारक असताना जेमतेम २५० विक्रेत्यांनीच पालिकेकडून व्यवसायासाठी अधिकृत परवाना घेतला आहे. अद्यापही साडेतीनशे विक्रेते विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात ३७ अनधिकृत व्यावसायिकांना महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. परवाना नसलेल्या विक्रेत्यांना यापुढे …
The post नाशिकमध्ये साडेतीनशेहून अधिक मांस विक्रेते अनधिकृत appeared first on पुढारी.