कॅश फॉर क्वेरी प्रकरण भोवले: तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी
पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅश फॉर क्वेरी प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. या प्रकरणी खासदार महुआ मोईत्रा यांच्याबाबत नैतिक आचरण समितीने आज शुक्रवारी (दि.८) लोकसभेत अहवाल सादर केला होता. नैतिक आचरण समितीने अहवालातून खासदार मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची आणि केंद्र सरकारकडून वेळेत चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा आज (दि. ८) केली. मोईत्रा यांचे खासदार म्हणून वर्तन अनैतिक आणि अशोभनीय असल्याचा समितीचा निष्कर्ष हे सभागृह मान्य करत आहे. त्यामुळे त्यांचे खासदार म्हणून राहणे योग्य नाही, अशी टिप्पणी बिर्ला यांनी केली. Mahua Moitra
संबंधित बातम्या
Mahua Moitra : महुआ मोईत्रा यांच्याविरोधात एथिक्स कमिटीचा अहवाल सादर; लोकसभेत विरोधकांचा गदारोळ
महुआ मोईत्रा यांच्यावरील अपात्र कारवाईनंतर अधीर रंजन चौधरी यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
Mahua Moitra : महुआ मोईत्रांना प्रश्नांच्या बदल्यात मौल्यवान भेटवस्तू दिल्या : दर्शन हिरानंदानी
महुआ मोइत्रांनी केलेल्या गंभीर गैरवर्तनाबद्दल कठोर शिक्षेची गरज आहे. त्यामुळे समितीने शिफारस केली आहे की खासदार महुआ मोईत्रा यांची सतराव्या लोकसभेच्या सदस्यत्वावरून हकालपट्टी केली जाऊ शकते. महुआ मोईत्रांच्या अत्यंत आक्षेपार्ह, अनैतिक, गंभीर आणि गुन्हेगारी वर्तनाच्या पार्श्वभूमीवर समितीने केंद्र सरकारला कालबद्ध पद्धतीने सखोल, कायदेशीर, संस्थात्मक चौकशी करण्याची शिफारसही केली आहे. Mahua Moitra
कॅश फॉर क्वेरी प्रकरणात नैतिक आचरण समितीचा अहवाल आज लोकसभेत सादर होताच विरोधकांनी त्याला जोरदार विरोध केला. यामुळे लोकसभेत गदारोळ झाल्याने कामकाज काहीवेळ तहकूब करण्यात आले.
Mahua Moitra : लोकसभा अध्यक्षांकडून कठोर कारवाईचे संकेत
महुआ मोईत्रा प्रकरणावरील लोकसभेच्या नैतिक आचरण समितीच्या ४९५ पानांच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी किमान ४ दिवस देण्यात यावे, असे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे. तर काही कठोर निर्णय घ्यायचे असतील तर ते सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी घ्यावे लागतील, असे स्पष्ट संकेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले आहेत. दरम्यान, विरोधी सदस्यांचे म्हणणे आहे की त्यांना महुआ मोईत्रा विरुद्धच्या ‘कॅश फॉर क्वेरी’ तक्रारीवरील आचार समितीच्या अहवालाच्या प्रती मिळालेल्या नाहीत.
‘कॅश फॉर क्वेरी’ काय आहे प्रकरण ?
उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून महुआ मोईत्रा यांनी पैसे तसेच भेट वस्तू घेऊन संसदेत प्रश्न विचारले असल्याची तक्रार भाजप नेते निशिकांत दुबे यांनी लोकसभाध्यक्षांकडे केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी समूहावर प्रश्न विचारण्यासाठी खासदार मोइत्रा यांनी लाच घेतल्याचे त्यात म्हटले होते. महुआ मोईत्रा यांचे पूर्वाश्रमीचे निकटवर्तीय जय अनंत देहादराय यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे निशिकांत दुबे यांनी ही तक्रार केली होती. त्यात, व्यावसायिक लाभासाठी विचारलेल्या प्रश्नांसाठी महुआ मोईत्रा त्यांचा लोकसभेचा लॉगीन आयडी आणि पासवर्ड हिरानंदानी यांच्याकडे देण्यात आल्याचा उल्लेख होता.
विशेष म्हणजे हिरानंदानी यांनीही त्याबाबत कबुली दिली होती. संसदेच्या सुरक्षेशी निगडीत हे प्रकरण लोकसभाध्यक्षांनी लोकसभेच्या नैतिक आचरण समितीकडे चौकशीसाठी सोपविले होते. समितीने चौकशी पूर्ण करून अहवाल आणि आपल्या शिफारशी लोकसभाध्यक्षांकडे सुपूर्द केल्या आहेत. अर्थात, महुआ मोईत्रा यांना व्यक्तिगत स्वरुपाचे प्रश्न विचारल्याच्या आरोप प्रत्यारोपांवरून समितीची चौकशीही वादळी ठरली होती.
#WATCH | Cash for query matter | TMC’s Mahua Moitra expelled as a Member of the Lok Sabha; House adjourned till 11th December.
Speaker Om Birla says, “…This House accepts the conclusions of the Committee that MP Mahua Moitra’s conduct was immoral and indecent as an MP. So, it… pic.twitter.com/mUTKqPVQsG
— ANI (@ANI) December 8, 2023
The post कॅश फॉर क्वेरी प्रकरण भोवले: तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅश फॉर क्वेरी प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. या प्रकरणी खासदार महुआ मोईत्रा यांच्याबाबत नैतिक आचरण समितीने आज शुक्रवारी (दि.८) लोकसभेत अहवाल सादर केला होता. नैतिक आचरण समितीने अहवालातून खासदार मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची आणि केंद्र सरकारकडून वेळेत चौकशी करण्याची शिफारस केली होती. …
The post कॅश फॉर क्वेरी प्रकरण भोवले: तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी appeared first on पुढारी.