पिंपरी : एका अवलियाने घरातच फुलवली केशरशेती

पिंपरी : आयुष्यभरात उभा केलेला कारखाना कोरोनाच्या लाटेत गमावला. आता उतरत्या वयात सेवानिवृत्त आयुष्य जगण्यापेक्षा पिचलेल्या शेतकर्‍यांना उभारी देण्यासाठी त्यांनी चक्क घरातील एका खोलीत केसर शेती फुलवली नव्हे, तर यशस्वी केली आहे. स्मार्ट वर्क करून लाखोंचे उपन्न घेण्याचा मंत्र ते शेतकर्‍यांना देत आहेत. या 68 वर्षीय तरुण अवलियाचे नाव नरेंद्र मणिपूरकर आहे. सुरुवातीला मणिपुरकर यांचा … The post पिंपरी : एका अवलियाने घरातच फुलवली केशरशेती appeared first on पुढारी.
#image_title

पिंपरी : एका अवलियाने घरातच फुलवली केशरशेती

हेमांगी सूर्यवंशी

पिंपरी : आयुष्यभरात उभा केलेला कारखाना कोरोनाच्या लाटेत गमावला. आता उतरत्या वयात सेवानिवृत्त आयुष्य जगण्यापेक्षा पिचलेल्या शेतकर्‍यांना उभारी देण्यासाठी त्यांनी चक्क घरातील एका खोलीत केसर शेती फुलवली नव्हे, तर यशस्वी केली आहे. स्मार्ट वर्क करून लाखोंचे उपन्न घेण्याचा मंत्र ते शेतकर्‍यांना देत आहेत. या 68 वर्षीय तरुण अवलियाचे नाव नरेंद्र मणिपूरकर आहे.
सुरुवातीला मणिपुरकर यांचा सिमेंट आणि केमिकल प्लांटला लागणार्‍या मशीन बनविण्याच्या कारखाना होता. त्यावेळी फॅब्रिकेशन करुन मशीन तयार केल्या. त्यानतंर थोडाकाळ थांबलो आणि प्लस्टिक ब्लो मोल्डींगचे युनिट सुरु केले. या काळात मुलीचे शिषण पूर्ण झाले. आज ती पायलट म्हणून कार्यरत आहे. सेवानिवृत्त असल्यामुळे रिकामे न बसता आपण काही तरी वेगळे करावे, या उद्देशाने मी केशर शेती घरीच करण्याच्या दृष्टीने विचार करू लागलो.
त्याचा अभ्यास करण्यासाठी जम्मू- काश्मीरमधील पॅम्पोर भागात जाऊन सुमारे सहा वर्षे अभ्यास केला. केशर हे शाश्वत उत्पनाचे साधन आहे आणि केशरचे भाव देखील अन्य वस्तूंप्रमाणे कोसळत नाहीत ते स्थिर राहतात. त्यामुळे घरातील खोलीत
केशर शेती फुलविण्याची तयारी केली. त्यासाठी लागणारे कंद जम्मु काश्मीरमधून विकत घेतले. पिंपरीतील राहत्या घरी केशर शेती फुलविण्यास सुरुवात केली.
केशर शेतीसाठी थंड वातावरणाची गरज
या शेतीसाठी माती अथवा पाण्याची गरज भासत नाही. यासाठी थंड वातावरण लागते. त्यासाठी घरातील एसीचा वापर केला. धुके आणि हवा तयार करणारी फोगर मशीन घरीच तयार केली. यासाठी वेल्डींग मशीन, वुड कटिंग मशीन, राईट अँगल, केशर पीकासाठी हवे असणारे थंड वातावरण, स्वच्छ हवा, धुके अशा पद्धतीची वातावरण निर्मिती करावी लागते. सध्या या शेतीमधून सुमारे दीड लाख फुले तयार झाली आहेत.
असे फुलविले जाते केशर
केशर शेती करण्यासाठी लहान- लहान आकाराचे कंद यांचा वापर केला जातो. या कंदाला पाणी किंवा मातीची गरज लागत नाही. हे कंद सुरुवातीला अंधारात ठेवले जातात. काही काळानंतर हे कंद उजेडात ठेवले जातात. त्यानंतर हे कंद ट्रे मध्ये ठेवले जातात. काही कालावधीनंतर या कंदांना कोंब फुटतात. ते 3 ते 4 इंच एवढे वाढतात. यातूनच फुले येण्यास सुरुवात होते; तसेच एका कोंबास 3 ते 4 फुले येतात. फुलातील लाल धागे म्हणजेच केशर होय. तसेच फुलामध्ये आणखी तीन पिवळे केसर असतात. त्याला केशरपट्टी म्हणतात.
फुले येण्याचा कालावधी
सप्टेंबरच्या मध्यापासून ते नोव्हेंबरच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत कंदांना फुले येतात. त्यानंतर फुले येण्याचे बंद होतात. हे कंद 7 ते 8 वर्षे फुले देतात. डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत या कंदांना 5 ते 6 कंद येतात; मात्र हे छोटे कंद मुख्य कंदाचा आधार घेवूनच मोठे होतात. त्यानंतर ते स्वतंत्रपणे वाढायला लागतात.
हेही वाचा

ठाणे: श्री रामाच्या दर्शनसाठी मीरारोड येथील ३०० भक्त अयोध्याला पायी जाणार
भोर येथे अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांचा पुढाकार
पाणी, ज्यूस हाच तिचा 50 वर्षांपासूनचा आहार

The post पिंपरी : एका अवलियाने घरातच फुलवली केशरशेती appeared first on पुढारी.

पिंपरी : आयुष्यभरात उभा केलेला कारखाना कोरोनाच्या लाटेत गमावला. आता उतरत्या वयात सेवानिवृत्त आयुष्य जगण्यापेक्षा पिचलेल्या शेतकर्‍यांना उभारी देण्यासाठी त्यांनी चक्क घरातील एका खोलीत केसर शेती फुलवली नव्हे, तर यशस्वी केली आहे. स्मार्ट वर्क करून लाखोंचे उपन्न घेण्याचा मंत्र ते शेतकर्‍यांना देत आहेत. या 68 वर्षीय तरुण अवलियाचे नाव नरेंद्र मणिपूरकर आहे. सुरुवातीला मणिपुरकर यांचा …

The post पिंपरी : एका अवलियाने घरातच फुलवली केशरशेती appeared first on पुढारी.

Go to Source