महुआ मोईत्रा यांची खासदारकी धोक्यात, लोकसभेतून हकालपट्टीची शिफारस

पुढारी ऑनलाईन : कॅश फॉर क्वेरी प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याबाबत नैतिक आचरण समितीने आज शुक्रवारी (दि.८) लोकसभेत अहवाल सादर केला. नैतिक आचरण समिती अहवालातून TMC च्या खासदार महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची आणि केंद्र सरकारकडून वेळेत चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. महुआ मोइत्रांनी केलेल्या गंभीर गैरवर्तनाबद्दल कठोर शिक्षेची गरज आहे. … The post महुआ मोईत्रा यांची खासदारकी धोक्यात, लोकसभेतून हकालपट्टीची शिफारस appeared first on पुढारी.
#image_title

महुआ मोईत्रा यांची खासदारकी धोक्यात, लोकसभेतून हकालपट्टीची शिफारस

पुढारी ऑनलाईन : कॅश फॉर क्वेरी प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याबाबत नैतिक आचरण समितीने आज शुक्रवारी (दि.८) लोकसभेत अहवाल सादर केला. नैतिक आचरण समिती अहवालातून TMC च्या खासदार महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची आणि केंद्र सरकारकडून वेळेत चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
महुआ मोइत्रांनी केलेल्या गंभीर गैरवर्तनाबद्दल कठोर शिक्षेची गरज आहे. त्यामुळे समितीने शिफारस केली आहे की खासदार महुआ मोईत्रा यांची सतराव्या लोकसभेच्या सदस्यत्वावरून हकालपट्टी केली जाऊ शकते. महुआ मोइत्रांच्या अत्यंत आक्षेपार्ह, अनैतिक, गंभीर आणि गुन्हेगारी वर्तनाच्या पार्श्वभूमीवर समितीने केंद्र सरकारला कालबद्ध पद्धतीने सखोल, कायदेशीर, संस्थात्मक चौकशी करण्याची शिफारस केली आहे.
कॅश फॉर क्वेरी प्रकरणात नैतिक आचरण समितीचा अहवाल आज लोकसभेत सादर होताच विरोधकांनी त्याला जोरदार विरोध केला. यामुळे लोकसभेत गदारोळ झाल्याने कामकाज काहीवेळ तहकूब करण्यात आले.
महुआ मोईत्रा यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ नये अशी मागणी संसदीय समित्यांच्या नियमांचा हवाला देत काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी याआधी केली होती. यानंतर, तृणमूल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनीही या कारवाईला विरोध व्यक्त केला आहे.

Ethics Committee report recommends the expulsion of TMC MP Mahua Moitra from Lok Sabha and investigation by the Government of India in time bound manner.
The report reads – (i) The serious misdemeanours on the part of Mahua Moitra calls for severe punishment. The Committee,…
— ANI (@ANI) December 8, 2023

The post महुआ मोईत्रा यांची खासदारकी धोक्यात, लोकसभेतून हकालपट्टीची शिफारस appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : कॅश फॉर क्वेरी प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याबाबत नैतिक आचरण समितीने आज शुक्रवारी (दि.८) लोकसभेत अहवाल सादर केला. नैतिक आचरण समिती अहवालातून TMC च्या खासदार महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची आणि केंद्र सरकारकडून वेळेत चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. महुआ मोइत्रांनी केलेल्या गंभीर गैरवर्तनाबद्दल कठोर शिक्षेची गरज आहे. …

The post महुआ मोईत्रा यांची खासदारकी धोक्यात, लोकसभेतून हकालपट्टीची शिफारस appeared first on पुढारी.

Go to Source