३ राज्यांतील मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपकडून हालचालींना वेग

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्यप्रदेशसह राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. लोकसभा २०२४ ची सेमीफायनल मानल्या जाणाऱ्या या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळाले. या निवडणुकांवरून लोकसभेचे चित्र स्पष्ट झाले आहे. यानंतर तीन राज्यांच्या मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपकडून हालचालींना वेग आला आहे. दरम्यान पक्षाकडून तीन राज्यातील नेता (मुख्यमंत्री) निवडीसाठी निरिक्षकांची नियुक्ती … The post ३ राज्यांतील मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपकडून हालचालींना वेग appeared first on पुढारी.
#image_title

३ राज्यांतील मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपकडून हालचालींना वेग

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्यप्रदेशसह राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. लोकसभा २०२४ ची सेमीफायनल मानल्या जाणाऱ्या या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळाले. या निवडणुकांवरून लोकसभेचे चित्र स्पष्ट झाले आहे. यानंतर तीन राज्यांच्या मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपकडून हालचालींना वेग आला आहे. दरम्यान पक्षाकडून तीन राज्यातील नेता (मुख्यमंत्री) निवडीसाठी निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती भाजपने X (पूर्वीचे ट्विटर)  पोस्ट करून दिली आहे. ( BJP News)
भाजपने त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत तीन राज्यातील हालचालींची माहिती दिली आहे. भाजपने म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. ( BJP News)

भारतीय जनता पार्टी के संसदीय बोर्ड ने राजस्थान, मध्य प्रदेश एवं छत्तीसगढ़ में पार्टी विधायक दल के नेता के चुनाव हेतु केंद्रीय पर्यवेक्षकों की नियुक्ति की है। pic.twitter.com/UYv1goanjI
— BJP (@BJP4India) December 8, 2023

राजस्थान विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाचे नाव निश्चित करण्यासाठी भाजपमध्ये प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात भाजपने राजस्थानसाठी निरीक्षक म्हणून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे, सरोज पांडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. उपस्थितीत राजस्थानमध्ये विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून, त्यात संभाव्य नावांवर चर्चा करून राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेतला जाणार आहे? इतर दोन राज्यात देखील अशीच प्रक्रिया राबवली जाणार असून, मुख्यमंत्री पदासाठी नेता निवडला जाणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
तीन राज्यांत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोणती नावे?
राजस्थानः मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत वसुंधरा राजे, खासदार दिया कुमारी, ओम बिर्ला, भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत आणि बाबा बालकनाथ यांची नावे आहेत.
मध्य प्रदेशः शिवराज सिंह चौहान, प्रल्हाद पटेल, नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह अनेक नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.
छत्तीसगडः छत्तीसगडमध्ये रमण सिंह, भाजप प्रदेशाध्यक्ष अरुण साओ, रेणुका सिंह आणि ओपी चौधरी यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.
हेही वाचा:

BJP Party meeting : भाजप खासदारांनी आता लोकसभेच्या तयारीला लागावे – PM मोदी
BJP MPs | नरेंद्र तोमर, प्रल्हाद पटेल, राठोड यांच्यासह भाजपच्या १० खासदारांचे राजीनामे
तीन राज्यांत भाजपची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल

The post ३ राज्यांतील मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपकडून हालचालींना वेग appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्यप्रदेशसह राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. लोकसभा २०२४ ची सेमीफायनल मानल्या जाणाऱ्या या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळाले. या निवडणुकांवरून लोकसभेचे चित्र स्पष्ट झाले आहे. यानंतर तीन राज्यांच्या मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपकडून हालचालींना वेग आला आहे. दरम्यान पक्षाकडून तीन राज्यातील नेता (मुख्यमंत्री) निवडीसाठी निरिक्षकांची नियुक्ती …

The post ३ राज्यांतील मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपकडून हालचालींना वेग appeared first on पुढारी.

Go to Source