युरिया खताची कृत्रिम टंचाई; शेतकऱ्यांची गैरसोय

पिंपळनेर(जि. धुळे) : पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील इंदवेसह परिसरात गेल्या आठवड्यापासून युरिया खतांची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने युरिया खताची खरेदी करावी लागत आहे. रब्बी हंगामात गहू, भाजीपाला, ज्वारी यासह इतर पिकांसाठी युरियाची गरज भासते. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे युरियाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. परंतु बाजारात मात्र युरिया … The post युरिया खताची कृत्रिम टंचाई; शेतकऱ्यांची गैरसोय appeared first on पुढारी.
#image_title

युरिया खताची कृत्रिम टंचाई; शेतकऱ्यांची गैरसोय

पिंपळनेर(जि. धुळे) : पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील इंदवेसह परिसरात गेल्या आठवड्यापासून युरिया खतांची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने युरिया खताची खरेदी करावी लागत आहे.
रब्बी हंगामात गहू, भाजीपाला, ज्वारी यासह इतर पिकांसाठी युरियाची गरज भासते. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे युरियाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. परंतु बाजारात मात्र युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिसरातील बहुतांश कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे युरिया खत उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. ज्या विक्रेत्याकडे युरिया खत उपलब्ध आहे, त्यात काहीजण मात्र चढ्या दराने खताची विक्री करीत असल्याची प्रतिक्रीया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.
सध्या गव्हाच्या व ज्वारीच्या पिकाला नत्राची आवश्यकता आहे. परंतु युरिया उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. शेतकरी तालुकाभर युरिया खतासाठी चकरा मारत आहेत. परंतु कुठेही खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. गव्हाला वेळेवर नत्राची मात्रा न दिल्यास उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
युरिया उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक दुकानांमध्ये युरिया उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांना कापूस पिक मोडून त्यावर गहू किंवा समर्थित इतर पिक घ्यावे लागणार आहे. त्यासाठी युरिया खत गरजेचे आहे. परंतु सध्या मात्र बाजारात खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असल्याने ज्या विक्रेत्याकडे युरिया उपलब्ध आहे, त्या विक्रेत्याकडून मात्र युरियाची चढया दराने विक्री होत आहे.
शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने युरिया खताची खरेदी करावी लागत असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. या कृत्रिम टंचाईला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा :

हजारो कामगारांवर कोसळणार बेरोजगारीची कुर्‍हाड
अडीच टन वजनाचा अजस्र मासा!
Priyank Kharge Statement : नाशिकमध्ये खर्गेपुत्राची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

The post युरिया खताची कृत्रिम टंचाई; शेतकऱ्यांची गैरसोय appeared first on पुढारी.

पिंपळनेर(जि. धुळे) : पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील इंदवेसह परिसरात गेल्या आठवड्यापासून युरिया खतांची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने युरिया खताची खरेदी करावी लागत आहे. रब्बी हंगामात गहू, भाजीपाला, ज्वारी यासह इतर पिकांसाठी युरियाची गरज भासते. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे युरियाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. परंतु बाजारात मात्र युरिया …

The post युरिया खताची कृत्रिम टंचाई; शेतकऱ्यांची गैरसोय appeared first on पुढारी.

Go to Source