आजपासून जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा तिसरा टप्पा सुरू

आजपासून जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा तिसरा टप्पा सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून (दि.१५) सुरूवात होत आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीतून आज जाहीर सभेने या दौऱ्याला सुरूवात होणार आहे.
मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. हा दौरा एकुण सहा टप्प्यांमध्ये आहे. आजपासून तिसऱ्या टप्प्यातील दौरा सुरु होत आहे. कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून दौऱ्याचा शुभारंभ होईल. दरम्यान, ‘हा दौरा स्वखर्चाने होणार असून मराठा आंदोलनासाठी कोणी पैसे मागत असेल तर देवू नका, असे आवाहनही जरांगेंनी केले आहे.
आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही
मराठा आंदोलनाला डाग लागता कामा नये. आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. १ डिसेंबर पासून साखळी उपोषणाला सुरुवात करणार आहे. त्याआधी मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : 

जळगाव : लाच घेताना सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
वाळू माफियांनी पीएसआयला चिरडल्‍याप्रकरणी बिहारचे मंत्री म्‍हणाले, “अशा घटना काही नवीन नाहीत”
Pune News : शरद पवारांनी अजित पवारांचा उल्लेख टाळला

The post आजपासून जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा तिसरा टप्पा सुरू appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून (दि.१५) सुरूवात होत आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीतून आज जाहीर सभेने या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. हा दौरा एकुण सहा टप्प्यांमध्ये आहे. आजपासून तिसऱ्या …

The post आजपासून जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा तिसरा टप्पा सुरू appeared first on पुढारी.

Go to Source