मासिक पाळीतील वेदनांवरील पेनकिलर Meftal मुळे साईड इफेक्ट; IPCचा धोक्याचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क: वेदना कमी होण्यासाठी तुम्ही देखील मेफ्टल (Meftal) पेनकिलर घेत असाल तर, सरकारकडून सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. इंडियन फार्माकोपिया कमिशनने (IPC) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुम्ही जर मेफ्टल ही पेनकिलर घेत असाल तर याचे दुष्परिणाम होण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे, या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. (Painkiller Meftal) … The post मासिक पाळीतील वेदनांवरील पेनकिलर Meftal मुळे साईड इफेक्ट; IPCचा धोक्याचा इशारा appeared first on पुढारी.
#image_title

मासिक पाळीतील वेदनांवरील पेनकिलर Meftal मुळे साईड इफेक्ट; IPCचा धोक्याचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क: वेदना कमी होण्यासाठी तुम्ही देखील मेफ्टल (Meftal) पेनकिलर घेत असाल तर, सरकारकडून सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. इंडियन फार्माकोपिया कमिशनने (IPC) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुम्ही जर मेफ्टल ही पेनकिलर घेत असाल तर याचे दुष्परिणाम होण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे, या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. (Painkiller Meftal)
इंडियन फार्माकोपिया कमिशनने प्रसिद्ध केलेल्या अॅव्हार्जरीमध्ये म्हटले आहे की, इंडियन फार्माकोपिया कमिशनने (IPC) मेफ्टल पेनकिलरच्या सुरक्षेसंदर्भात सरकारकडून अलर्ट जारी केला आहे. मेफ्टल या पेनकिलरमधील मेफेनॅमिक ऍसिडमुळे इओसिनोफिलिया आणि ड्रेस सिंड्रोम सारख्या ऍलर्जीचे संक्रमण होऊ शकते. ड्रेस सिंड्रोममध्ये त्वचेवर पुरळ उठणे, पिंपल्सची ऍलर्जी होऊ शकते. काहीवेळा त्याचे खूप गंभीर दुष्परिणाम देखील होऊ शकतात. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच मेफ्टलचे सेवन करावे, असेही सरकारकडून देण्यात आलेल्या अलर्टमध्ये म्हटले आहे. (Painkiller Meftal)
Painkiller Meftal: मासिक पाळी दरम्यान घेतली जाते ‘Meftal’ पेनकिलर
बहुतांशी डक्टरांकडून संधिवात, ऑस्टियोआर्थरायटिस, डिसमेनोरिया, सौम्य ते मध्यम वेदना, जळजळ, ताप आणि दातदुखीच्या उपचारांसाठी मेफ्टल (Meftal) पेनकिलर लिहून दिली जाते. तर काही वेळा बहुतांशी महिलांकडून मासिक पाळीच्या दरम्यान पेटके आणि सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी ही पेनकिल घेतली जाते.

 

View this post on Instagram

 
A post shared by The Times of India (@timesofindia)

इंडियन फार्माकोपिया कमिशनने (IPC) ३० नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या अलर्टनुसार, आरोग्यसेवा व्यावसायिक, रुग्ण/ग्राहकांना संशयित औषधाच्या वापरासंबंधित प्रतिकूल प्रतिक्रियाच्या (ADRs) शक्यतेचे बारकाईने निरीक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या IPC आयोगाकडून तक्रार नोंदवण्याची सूचना
इंडियन फार्माकोपिया कमिशनच्या सतर्कतेने असा सल्ला दिला आहे की, या संदर्भातील काही घटना समोर आल्यास लोकांनी वेबसाइट – www.ipc.gov.in – किंवा Android मोबाइल अॅप ADR PvPI, हेल्पलाइन क्रमांक 1800-180-3024 द्वारे एक फॉर्म भरून राष्ट्रीय समन्वय केंद्राकडे तक्रार नोंदवण्याची सूचना केली आहे. IPC ही आरोग्य मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. जी भारतात उत्पादित, विक्री आणि सेवन केलेल्या सर्व औषधांसाठी मानके ठरवते.
हेही वाचा:

UPI payment | रुग्णालये, शैक्षणिक संस्थांसाठी यूपीआय पेमेंट मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवली, आरबीआयची घोषणा
RBI Monetary Policy | कर्जदारांना दिलासा कायम, RBI कडून सलग पाचव्यांदा रेपो रेटमध्ये बदल नाही, GDP वाढ ७ टक्के राहणार

The post मासिक पाळीतील वेदनांवरील पेनकिलर Meftal मुळे साईड इफेक्ट; IPCचा धोक्याचा इशारा appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: वेदना कमी होण्यासाठी तुम्ही देखील मेफ्टल (Meftal) पेनकिलर घेत असाल तर, सरकारकडून सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. इंडियन फार्माकोपिया कमिशनने (IPC) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुम्ही जर मेफ्टल ही पेनकिलर घेत असाल तर याचे दुष्परिणाम होण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे, या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. (Painkiller Meftal) …

The post मासिक पाळीतील वेदनांवरील पेनकिलर Meftal मुळे साईड इफेक्ट; IPCचा धोक्याचा इशारा appeared first on पुढारी.

Go to Source