नंदुरबार : ‘एक्साईज’चा लागोपाठ दणका; पाऊण कोटींचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार – महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी (दि. 5) ते 7 असे सलग तीन दिवसांपासून रोज छापेमारी चालवल्यामुळे अवैध मद्य विक्रेते चक्रावून गेले आहेत. जिल्ह्यात परराज्यातील आणि विदेशी मद्यसाठयाच्या होत असलेल्या अवैध वाहतुकी विरोधात जोरदारपणे कारवाई सुरू असून प्रकाशा येथे सलग तिसरा छापा टाकून सुमारे 30 लाख रुपयांचा मद्य साठा पकडण्यात आला. तळोदा … The post नंदुरबार : ‘एक्साईज’चा लागोपाठ दणका; पाऊण कोटींचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.
#image_title
नंदुरबार : ‘एक्साईज’चा लागोपाठ दणका; पाऊण कोटींचा मुद्देमाल जप्त


नंदुरबार – महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी (दि. 5) ते 7 असे सलग तीन दिवसांपासून रोज छापेमारी चालवल्यामुळे अवैध मद्य विक्रेते चक्रावून गेले आहेत. जिल्ह्यात परराज्यातील आणि विदेशी मद्यसाठयाच्या होत असलेल्या अवैध वाहतुकी विरोधात जोरदारपणे कारवाई सुरू असून प्रकाशा येथे सलग तिसरा छापा टाकून सुमारे 30 लाख रुपयांचा मद्य साठा पकडण्यात आला.
तळोदा तालुक्यात आमलाड आणि अक्कलकुवा तालुक्यातील डाब शिवारात कारवाई केल्याच्या पाठोपाठ (दि.7) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभाग भरारी पथकाने देखील प्रकाशा अक्कलकुवा रस्त्या लगत, प्रकाशा शिवार, प्रकाशा ता. शहादा या ठिकाणी वाहनतपासणी सापळा रचून महाराष्ट्रात प्रतीबंधीत असलेले गोवा राज्यात निर्मीत विदेशी मद्य ३०० बॉक्स आणि महिंद्रा बोलेरो मॅक्स पीकअप असा ३० लाख ६७ हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सागर शांतीलाल सैंदाणे (वाहनचालक), वय २८ वर्षे, राहणार संत गाडगेनगर, बोराडी, ता. शिरपुर, जि.धुळे, कमलेश सुभाष पाटील, राहणार मु.पो. बोराडी ता. शिरपुर जि.धुळे (फरार) मद्य पुरवठा दार, विणा (पुर्ण नाव माहित नाही) (फरार) सदर वाहन क्र.MH.१८.BZ०८५१ चे मालक व संशयीत अज्ञात इसम यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई डॉ. बा.ह. तडवी, विभागीय उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक तसेच  स्नेहा सराफ, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार यांचे मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक ए.एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक ए.जी. सराफ, व्ही.बी.पाटील, जवान सर्वश्री भाऊसाहेब घुले, धनराज पवार, महेश सातपुते, यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्हयाचा पुढील तपास व्ही. बी. पाटील, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक हे करीत आहेत.
या आधी दि. 05/12/2023 रोजी रात्री अंकलेश्वर ते बन्हाणपुर रस्त्यालगत आमलाड शिवार हॉटेल सद्भावना समोर पत्रीशेडमधे मद्य साठा ठेवण्यात आल्याची गुप्त बातमी पथकाला प्राप्त झाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला. त्यावेळी दोन वाहनातून तसेच पत्राशेडमधून परराज्यातील विदेशी मद्य व बियरचे एकुण २३३ बॉक्ससह एकुण रू. 25 लाख 83 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नंतर डाब परिसरात छापा टाकण्यात आला. मुंबईतील भरारी पथकाने दि. ०६/१२/२०२३ रोजी अक्कलकुवा-मोलगी रस्त्यावर डाब गावाच्या हद्दीत आश्रम शाळेजवळ पाळत ठेवून गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे १८० बॉक्स व अशोक लेलैंड कंपनीचा चार चाकी टेम्पो क्र. MH-39-AD-1639 हे वाहन असा एकूण रु. २०,४४,४००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान अमलीबारी जवळील घाट रस्त्यात या कारवाई करणाऱ्या पथकावर अचानक काही जणांनी दगडफेक केल्याची घटना घडली. याप्रकरणी 2 जणांना अटक झाली आहे.
हेही वाचा :

RBI च्या निर्णयाने Nifty ने गाठला २१ हजारांचा टप्पा, सेन्सेक्स ७० हजारांजवळ
KCR injured : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव रूग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
धुळे ग्रामीणच्या विकासाची घोडदौड कायम; रस्ते, पुलांच्या कामांसाठी 20 कोटी मंजूर

The post नंदुरबार : ‘एक्साईज’चा लागोपाठ दणका; पाऊण कोटींचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

नंदुरबार – महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी (दि. 5) ते 7 असे सलग तीन दिवसांपासून रोज छापेमारी चालवल्यामुळे अवैध मद्य विक्रेते चक्रावून गेले आहेत. जिल्ह्यात परराज्यातील आणि विदेशी मद्यसाठयाच्या होत असलेल्या अवैध वाहतुकी विरोधात जोरदारपणे कारवाई सुरू असून प्रकाशा येथे सलग तिसरा छापा टाकून सुमारे 30 लाख रुपयांचा मद्य साठा पकडण्यात आला. तळोदा …

The post नंदुरबार : ‘एक्साईज’चा लागोपाठ दणका; पाऊण कोटींचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Go to Source